शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेला कुणी कमजोर समजू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषद निवडणूक महाविकास आघाडीद्वारे लढण्याचा प्रयत्न आहे. पक्ष जो आदेश देईल त्यानुसार निर्णय ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषद निवडणूक महाविकास आघाडीद्वारे लढण्याचा प्रयत्न आहे. पक्ष जो आदेश देईल त्यानुसार निर्णय घेतला जाईल. परंतु कुणी शिवसेनेला कमजोर समजत असेल तर आम्हीही आमची ताकद दाखवून देवू, सर्वच ५६ जागांवर निवडणूक लढविण्याची शिवसेनेचीही तयारी असल्याचे प्रतिपादन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात बोलतांना केले.शिवसेनेचा जिल्हा मेळावा व इच्छुकांच्या मुलाखती शनिवारी दुपारी नंदुरबारातील संजय टाऊन हॉलमध्ये झाला. यावेळी जिल्हा प्रमुख डॉ.विक्रात मोरे, आमशा पाडवी, माजी जि.प.सदस्य विजय पराडके, जेलसिंग पावरा, भाऊ राणा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, विधानसभा निवडणूक भाजप-शिवसेनेने एकत्र लढविली होती. परंतु निवडणुकीनंतर गणिते बदलली आणि महाविकास आघाडी निर्माण झाली. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणूक देखील महाविकास आघाडीमार्फत लढविण्याचा प्रयत्न आहे. पक्ष जो आदेश देईल त्यानुसार निवडणूक लढविली जाईल. परंतु शिवसेना आग्रही आहे म्हणून कुणी कमजोर समजत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. शिवसेनाही ५६ जागांवर लढण्यास तयार आहे. त्यामुळे सर्वच जागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. नवापूर पालिका पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी पुढे आली आहे. एक जागा काँग्रेस व एक जागा शिवसेना भाजपविरोधात लढवत आहे. त्यामुळे आघाडीचा फायदा हा तिन्ही पक्षांना मिळणार आहे. परवा काँग्रेसच्या मेळाव्यात स्वबळाची भाषा बोलली गेली. परंतु तसे होणार नाही. कुणी गुर्मी दाखवत असेल तर ती गुर्मी उतरविण्यातही शिवसेना सक्षम असल्याचे रघुवंशी यांनी सांगितले.पक्ष कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. गुणवत्तेनुसार आणि निवडून येण्याची क्षमता असलेल्यांनाच तिकीट देण्यात येणार आहे. कुणी बंडखोरी करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना पक्ष सन्मानाने निरोप देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे यांनी एकसंघपणे आणि पुर्ण ताकदिनीशी शिवसेना या निवडणुकीत लढणार आहे. चंद्रकांत रघुवंशी यांनी ज्या दिवशी शिवसेनेत प्रवेश केला त्याच दिवशी जिल्हा परिषदेवर भगवा फडकविणार असल्याचा आमचा विश्वास निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.आमशा पाडवी यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन गजेंद्र शिंपी यांनी केले.