शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेतर्फे जिल्ह्यात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 21:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा/नवापूर :  पेट्रोल-डिझेलची भाववाढ, केंद्राचा कृषी कायदा आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा/नवापूर :  पेट्रोल-डिझेलची भाववाढ, केंद्राचा कृषी कायदा आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ शनिवारी नंदुरबार, शहादा व नवापूर येथे शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले.शहाद्यात घोषणाबाजीकेंद्र शासनाने केलेल्या शेतकरी हिताविरोधी केलेला कृषी कायदा रद्द करावा यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना खलिस्तानवादी अतिरेकी म्हणून संबोधणारे त्याचप्रमाणे या आंदोलनाला चीन व पाकिस्तान पैसा पुरवत असल्याचा दावा करणाऱ्या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी. तसेच पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात निषेध आंदोलन शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर शिवसेनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल व डिझेलच्या किमती अत्यंत कमी असताना केंद्र शासन यात दररोज वाढ करून जनतेची पिळवणूक करीत आहे. केंद्र शासनाच्या या कृतीचा निषेध करण्यात येऊन केंद्र शासनाने त्वरित डिझेल व पेट्रोलच्या किमती कमी कराव्यात. केंद्र शासनाने कृषी कायद्यांना मंजुरी दिली. हे कायदे शेतकरीविरोधी असल्याने यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून, धनिकांचा व व्यापाऱ्यांचा फायदा होणार असल्याने हे कायदे रद्द करावे आदी मागण्या आंदोलनकर्त्या शिवसैनिकांनी केल्या. यावेळी शिवसैनिकांच्या वतीने केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. माजी जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांच्यासह जिल्हा उपप्रमुख सखाराम मोते, जिल्हा संघटक मधुकर मिस्तरी, शहर प्रमुख रोहन माळी, तालुका संघटक भगवान अलकारी, शहर संघटक गणेश चित्रकथे, तालुका उपप्रमुख उत्तम पाटील, डॉ. सागर पाटील, बापू सूर्यवंशी, माजी नगरसेवक विनोद चौधरी, बापू चौधरी, दिलीप पाटील, सुरेश मोरे, गुलाब सुतार, प्रवीण सैंदाणे, बिपीन सोनार, इद्रीस मेमन, चुडामण पाटील, प्रदीप निकुंबे, विनोद पाटील, राहुल चौधरी, नाना बिरारे, प्रशांत नायक, प्रकाश शिरसाठ, वसीम अन्सारी, अशोक ईशी, ऋषिकेश शिवदे, अक्षय वाडिले, नीलेश पाटील, तौसिफ खान, अशपाक काझी, राजेश भावसार, सुदाम लोहार, सतीश पाटील, लहू बागले व शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते.नवापुरात तहसीलदारांना निवेदनकेंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ नवापूर तहसील कार्यालय येथे शिवसेनेच्या वतीने जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. नवापूर शहरातील बसस्थानक परिसरातून मोर्चाला सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. तसेच केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. शनिवारी सकाळी नवापूर शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. या वेळी शिवसेनेचे शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील, तालुका प्रमुख रमेश गावित, तालुका उपप्रमुख देवका पाडवी, प्रवीण ब्रह्मे, शहर प्रमुख गोविंद मोरे, शहर उपप्रमुख अनिल वारुळे, मनोज बोरसे, राहुल टिभे, दिनेश भोई, किसन कोळी, गणेश चौधरी राजेंद्र गावीत, गोपी सैन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. हसमुख पाटील म्हणाले, लॉकडाऊनचा परिणाम सर्व क्षेत्रांवर झाला आहे. नागरिकांच्या उत्पन्नाचे स्रोत बंद झाल्याने बेरोजगारीची वेळ त्यांच्यावर आली आहे. अशा परिस्थितीत केंद्र शासनाने केलेली इंधन दरवाढ चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा निषेध करून विरोधात घोषणा देण्यात आल्या.

नंदुरबारला मोटारसायकल ढकलत नेवून काढली रॅलीपेट्रोल, डिझेल व महागाई विरोधात केंद्र शासनाचा जाहीर निषेध व शेतकरी आंदोलनाविरोधात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्यामुळे नंदुरबार जिल्हा शिवसेनेतर्फे येथील नेहरू पुतळा परिसरात संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांच्या नेतृत्वाखाली जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच मोटारसायकल ढकलत नेवून रॅली काढण्यात आली. या वेळी जिल्हा उपप्रमुख रवींद्र गिरासे, मनोज चव्हाण, जि. प. उपाध्यक्ष राम रघुवंशी, नगरसेवक प्रवीण गुरव, मनीष बाफना, अर्जुन मराठे, रवींद्र पवार, दीपक दिघे, शहर प्रमुख राजधर माळी, तालुका संघटक जगदीश पाटील, पंडित माळी, तालुका उपप्रमुख सागर मराठे, सर्व शाखाप्रमुख व शिवसैनिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला.