शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे मेंढपाळ संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : गेले आठ महिने खडतर प्रवास करीत असताना पावसाची चाहूल लागली की, प्रत्येक मेंढपाळ आपल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : गेले आठ महिने खडतर प्रवास करीत असताना पावसाची चाहूल लागली की, प्रत्येक मेंढपाळ आपल्या गावाकडे प्रस्थान करीत असतात. मात्र या वर्षी मेंढपाळांना मोठ्या संकटांना समोरे जावे लागले.२२ मार्चपासून संचार बंदीमुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे मेंढपाळांना गावोगावी भटकंती करण्यास मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले. चार महिने मेंढ्यांना मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होत असतो. परंतु पावसाळा गेला की, पुन्हा एकदा हा धनगर समाज आपल्या जवळील असलेला मेंढ्यांच्या कळप घेवून येत असतात.साधारण दिवाळीच्या सणामध्ये या मेंढपाळांचे शहादा तालुक्यातील जिथे चाऱ्याची सोय होईल अश्या ग्रामीण भागात आगमन होत असते. पावसाळ्यात विविध प्रकारची झाडे निर्माण होत असता. तसेच पीक घेतल्यानंतर रिकाम्या झालेल्या शेतात शेतकरी मेंढ्यांचे कळप बोलवत असतात. शेतात मेंढ्यांचा कळप आल्याने शेतातच मेंढ्यांची विष्ठा पडत असल्याने त्याचा खतासारखा वापर होत असल्याचे शेतकऱ्यांनकडून सांगितले जाते. त्यामुळे त्यांच्या चाºयाचा प्रश्नदेखील मार्गी लागत असतो.ग्रामीण भागात आल्यानंतर मेंढपाळांचा प्रपंच आज इथे तर उद्या तिथे असे आॅक्टोबर-नोव्हेंबर ते मे-जून दरम्यान उघड्यावरच असतो. सुमारे २०० ते ३०० किलोमीटर मेंढपाळांना चाºयासाठी भटकंती करावी लागत असते. पाऊस पडू लागल्याचे चिन्ह निर्माण होताच मेंढपाळ आपल्या मेंढ्यांचा कळप घेऊन घराकडे परतीची वाट धरू लागले आहे. पाऊस उशिरा पडला किंवा पावसाने दडी मारली तर मेंढपाळांचा मुक्काम वाढत असतो. मात्र यावर्षी आलेले कोरोना संकटमुळे काही मेंढपाळांनी आपला मोर्चा लवकरच गावाकडे वळविला आहे. साधारणपणे जून महिन्यात मेंढपाळ निघत असतात. काही मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मार्गस्थ हात असतात. परंतु यंदा मात्र कोरोनाच्या भितीमुळे परतीच्या प्रवासात मेंढपाळ व्यस्त झालेचे चित्र पहावयास मिळत आहे.