शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

तिने पाहिलं.. आणि मने जिंकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 12:08 PM

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : युवारंग महोत्सव. दरवर्षीचा महोत्सव़़़ यंदा महोत्सवात उपस्थिती होती ती ‘मितवा’ चित्रपटातील व ‘पवित्र रिश्ता’ ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : युवारंग महोत्सव. दरवर्षीचा महोत्सव़़़ यंदा महोत्सवात उपस्थिती होती ती ‘मितवा’ चित्रपटातील व ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतील अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची. तिची झलक, तिची अदा तसेच बोलणे या सर्वांवर फिदा झालेली तरूणाई़़़ होय, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व शहादा येथील पूज्य साने गुरूजी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवारंगाच्या युवक महोत्सवाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात हे सारे दिसले.सिने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे बक्षीस वितरण कार्यक्रमाला येणार म्हणून तरूण-तरूणींमध्ये चैतन्य संचारले होते़ सोमवारी सकाळी साडेदहा वाजता पारितोषिक वितरण व समारोप कार्यक्रमाला प्रारंभ झाला़ हळूहळू मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होत गेली. तर दुसरीकडे तरूणाई अभिनेत्री प्रार्थना बेहेरे येणार या उत्सुकतेत त्यांच्या हृदयाचे ठोके धडधडत होते अन् काही क्षणानंतर ‘ती आली, तिने पाहिलं आणि सर्वांची मने जिंकली.’सेल्फीसाठी तो चक्करंगमंचाकडे धावलाफ्लार्इं कीस देत प्रार्थना बेहेरे हिने एन्ट्री करताच जल्लोष झाला़ तिला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली़ नंतर ती रंगमंचाकडे आल्यावर कार्यक्रमाला सुरूवात झाली़ मात्र आपल्याला गर्दीमध्ये सेल्फी काढता आला नाही म्हणून गणेश जोशी नामक युवकाने चक्क भर कार्यक्रमात रंगमंचावर धाव घेतली आणि प्रार्थना बेहरे हिच्यासोबत सेल्फी काढला़ नंतर त्यास रंगमंचावरून खाली उतरविण्यात आले़ काही वेळानंतर प्रार्थना बेहेरे यांनी त्याला पुन्हा रंगमंचावर बोलवून त्याच्या हिंमतीला दाद दिली़ मात्र त्यास ‘सॉरी’देखील म्हणायला लावले़ युवारंगच्या सभामंडपात प्रार्थना बेहेरे ही आल्यानंतर तिला पाहण्यासाठी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी प्रचंड गर्दी केली होती़‘इशारो-इशारो मैं’ सुरू होते संभाषणअभिनेत्रीसोबत फोटो मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांकडून रंगमंचाकडे गर्दी केली जात होती़ सेल्फी मिळावी यासाठी विद्यार्थी व प्रार्थना बेहेरे यांच्यामध्ये इशारो-इशारो मैं सभाषण सुरू होते तर विद्यार्थ्यांशी तिने संवाद साधल्यानंतर विद्यार्थ्यांनी धमाल केली़युवारंग गाण्यावर थिरकले पावलेकार्यक्रमात अधून-मधून युवारंग गीत लावण्यात येत होते़ या गीतावर बेधूंद होवून तरूणाई थिरकत होती़ या वेळी सभामंडप फुल्ल झाले होते.