शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

शेतीसाठी मजूर मिळवणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 12:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातून दरवर्षी होणारे स्थलांतर आणि शेतीकामांसाठी वाढता यंत्रांचा वापर याचा फटका शेतक-यांना बसतो आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातून दरवर्षी होणारे स्थलांतर आणि शेतीकामांसाठी वाढता यंत्रांचा वापर याचा फटका शेतक-यांना बसतो आहे. परिणामी शेतीकामांसाठी मजूर मिळत नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. सर्व काही मिळेल परंतू मजूर मिळत नसल्याने शेतकरी अक्षरश: मेटाकुटीला येत आहेत.             नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात खरीप आणि रब्बी पिकांच्या पेरण्या पूर्ण करण्यात आल्यानंतर त्यांचे संगोपन, फवारणी, कोळपणी, निंदणी, कापणी व वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याचे चित्र गेल्या काही वर्षात आहे. यातून धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातून मजूर शेतीकामांसाठी नंदुरबार तालुक्यात येतात. हीच गत तळोदा व शहादा तालुक्यातील आहे. याठिकाणी मजूर संख्या कमी असल्याने अडचणी येतात. मजूरही रोजंदारीपेक्षा क्षेत्रानुसार पैसे घेत काम पूर्ण करुन देतात. नवापूर, धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातून स्थलांतरीत झालेल्या मजूरांमुळे अनेक अडचणी येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मजूरी वाढवून देण्याची तयारी दर्शवूनही अनेकवेळा मजूर मिळत नाहीत. 

मजुरीचा दर                                                                                                                                                                                         पाच वर्षापूर्वीचा दर                                                                                                                                                                                    पुरुष मजूर : १०० रुपयेमहिला मजूर : १०० रुपये

यंदाचा मजुरी दर                                                                                                                                                                               पुरुष मजूर : १५० रुपयेमहिला मजूर : १५० रुपये

यंत्राने होणारी कामेपिक पेरणी, लागवड, कोळपणी आदी कामे यंत्राच्या माध्यमातून करण्यात येतात. नांगरटीसाठीही बरेच जण मजूरांऐवजी ट्रॅक्टरने नांगरटी करतात. 

कृषी यंत्रांचा वाढता वापर, मजूरांना नकार शेतीकामांसाठी मजूरांचा वापर कमी होण्यात यांत्रिकीकरणाचाही मोलाचा वाटा आहे. शेतक-यांनी ट्रॅक्टर खरेदीसाेबत शेतीपयोगी इतर यंत्रेही खरेदी केल्याने शेतीतील अडचणी दूर झाल्या आहेत. फवारणी करण्यासाठी ब-याच जणांकडे यंत्रे असल्याने मजूरांना मिळणारी मजूरी इतिहासजमा झाली आहे. 

मजूर मिळवण्यासाठी धावपळ

         नंदुरबार तालुक्यातील बहुतांश मोठे शेतकरी धडगाव, अक्कलकुवा तसेच तळोदा तालुक्यात जावून मजूर आणतात. हे मजूर दररोज येतात. त्यांचा वाहतूक खर्च द्यावा लागतो. वेळप्रसंगी त्यांना जेवणासाठीही खर्च करावा लागत असल्याचे बामडो येथील शेतकरी वसंत हिरामण पाटील यांनी सांगितले. 

       तळोदा तालुक्यातील सर्वच भागात मजूरांची संख्या कमी आहे. यातून रोजंदारीने काम करण्यापेक्षा क्षेत्र ठरवून ठोक दरांमध्ये काम करण्यावर भर दिला जातो. मजूरांची संख्या कमी असल्याने शेतक-यांच्या कामांचे नियोजन चुकत असल्याचे मोड ता. तळोदा येथील शेतकरी पुरुषोत्तम चव्हाण यांनी सांगितले. 

          रांझणी ता. तळोदा येथील निंबा नामदेव गवळी यांना संपर्क केला असता, मजूरांची संख्या कमी झाली आहे. दोन्ही हंगामात मजूर मिळणे ही मोठी गोष्ट असते. यातही शेतीचे संपूर्ण ज्ञान असलेले मजूर कमी झाले आहेत. शेतीकामात पारंगत असलेले मजूर मिळत नसल्याने कामांचे नियोजन चुकते. यातून ब-याच शेतक-यांचे नुकसानही होते.