शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

अश्व मारवाडी स्पर्धेत ‘शान’ने मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : एकमुखी दत्तप्रभूंच्या यात्रेत रविवारी भाविकांच्या गर्दीत वाढ झाली होती. दत्त मंदिरातही दर्शनासाठी भाविकांची गर्दी ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : एकमुखी दत्तप्रभूंच्या यात्रेत रविवारी भाविकांच्या गर्दीत वाढ झाली होती. दत्त मंदिरातही दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. यात्रेनिमित्त सुरू असलेल्या चेतक फेस्टीवलमध्ये अश्व मारवाडी स्पर्धेत ‘शान’ या घोड्याने प्रथम क्रमांक पटकावून बाजी मारली.सारंगखेडा येथील यात्रेत पहिल्या रविवारप्रमाणेच दुसऱ्या रविवारीही यात्रा भाविकांच्या गर्दीने फुल्ल झाली होती. सकाळपासूनच भाविकांची गर्दी सुरू झाली होती. एकमुखी दत्ताच्या दर्शनासाठी भाविकांच्या मंदिर परिसरात रांगा लागल्या होत्या. अनरद रस्ता व टाकरेखडा गावापर्यंत भाविकांच्या वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतुकीतही मोठा अडथळा निर्माण झाला होता. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली.यात्रेनिमित्त सुरू असलेल्या चेतक फेस्टीवलमध्ये अश्व मारवाडी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सहावेळा आॅल इंडिया चॅम्पियन ठरलेल्या ‘शान’ घोड्यानेही सहभाग नोंदवला. हा घोडा सातव्यांदा आपला मान अबाधीत ठेवतो का याबाबत अश्वशौकीनांमध्ये उत्सुकता लागून होती. या स्पर्धेत ४० स्पर्धकांमधून ‘शान’ने प्रथम क्रमांक पटकावून सातव्यांदा आॅल इंडिया चॅम्पियन होण्याचा मान मिळविला. घोडे मालकाला मान्यवरांच्या उपस्थितीत ७१ हजार रुपये रोख, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन ‘शान’ घोडा व त्याच्या मालकाला सन्मानीत करण्यात आले. या घोड्याला पाहण्यासाठी अश्वशौकीनांची गर्दी झाली होती.सारंगखेडा यात्रेला ११ डिसेंबरपासून सुरुवात झाली. यात्रेतील घोडे बाजारात पहिल्या दिवसापासूनच तेजी आहे. रविवारीही ३२ घोड्यांची विक्री होऊन त्यातून १४ लाख १४ हजार ५०० रुपयांची उलाढाल झाली. आजअखेर तीन हजार घोड्यांची आवक झाली असून ७६४ घोड्यांची विक्री झाली. यातून तीन कोटी दोन लाख दोन हजार ५०० रुपयांची उलाढाल झाली आहे.