शहादा महाविद्यालय क्रिडा क्षेत्रात जिल्ह्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 12:35 IST2020-06-06T12:35:42+5:302020-06-06T12:35:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने नंदुरबार जिल्ह्यात ...

Shahada College tops the district in the field of sports | शहादा महाविद्यालय क्रिडा क्षेत्रात जिल्ह्यात अव्वल

शहादा महाविद्यालय क्रिडा क्षेत्रात जिल्ह्यात अव्वल


लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने नंदुरबार जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रथम क्रमांक मिळविला आहे. महाविद्यालयास एक लाख रूपये प्रोत्साहनपर अनुदान देऊन गौरविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या क्रीडा विभागांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयाची प्रथम क्रमांकाने निवड झाली आहे.
राज्य शासनाच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्याकडून प्रथम क्रमांकाचे प्रोत्साहनपर अनुदान एक लाख रूपये देण्यात येणार आहे. ही रक्कम जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते महाविद्यालयास देऊन गौरविण्यात येणार आहे. या अनुदानातून महाविद्यालयात क्रीडाविषयक सुविधा, साहित्य तसेच विद्यार्थ्यांना पारितोषिक वाटप करण्यात येईल. कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या या प्रोत्साहनात्मक अनुदानासाठी प्राचार्य डॉ.आर.एस. पाटील, उपप्राचार्य प्रा.इंदिरा पटेल, पर्यवेक्षिका प्रा.कल्पना पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.अरविंद कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
महाविद्यालयास प्राप्त झालेल्या बहुमानाबद्दल मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष किशोर पाटील, सचिव कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील व पी.आर. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस. पाटील यांनी अभिनंदन केले.

Web Title: Shahada College tops the district in the field of sports