डाबच्या उम्राणीपाड्यात तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 12:43 IST2020-05-18T12:43:19+5:302020-05-18T12:43:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील डाबच्या उम्राणीपाडा येथे एकच हातपंप आहे. परंतु या हातपंपाला सुरूवातीपासूनच पाणी लागले ...

Severe water shortage in Dab's Umranipada | डाबच्या उम्राणीपाड्यात तीव्र पाणीटंचाई

डाबच्या उम्राणीपाड्यात तीव्र पाणीटंचाई

लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील डाबच्या उम्राणीपाडा येथे एकच हातपंप आहे. परंतु या हातपंपाला सुरूवातीपासूनच पाणी लागले नसल्याने या पाड्यावरील नागरिकांना अर्धा किलोमीटर पायपीट करीत शेवडी जवळील नाल्याच्या झिरप्यातून पिण्यासाठी पाणी आणावे लागत आहे. तसेच झिऱ्यात पाणी नसले तर अडीच किलोमीटर अंतरावरील देवालपाडा, पांडीपिपरीपाडा येथील हातपंपावरून पाणी आणावे लागत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येते.
तालुक्यातील डाबच्या उम्राणीपाडा येथे एक हातपंप आहे. परंतु त्यास सुरूवातीपासूनच पाणी लागले नसल्याने या पाड्यांवरील नागरिकांना अर्धा किलोमीटर अंतरावरील नाल्यात शेवडी बांधावी लागली होती. मात्र या शेवडीलाही पाणी नसल्याने शेवडीला लागून झिरा तयार केला. या झिºयातूनच नागरिकांना पाणी आणावे लागत आहे. तसेच काही नागरिकांना दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या देवालपाडा, पांडीपिपरीपाडा येथील हातपंपावरून भटकंती करीत पाणी आणावे लागत आहे. दरम्याने, गुरांनाही दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पांडीपिपरीपाडा येथील तलावावर पाणी पिण्यासाठी न्यावे लागत आहे.
जून व जुलै महिन्यात तर डाबच्या उम्राणीपाडा येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण होत असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. पावसाळ्यात तर नाल्याला पाणी आल्याने झिºयातील वरवरचे चांगले पाणी घेवून त्याचा उपयोग पिण्यासाठी केला जातो, असेही या नागरिकांकडून सांगण्यात येते. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून पाण्यासाठी होणारी वणवण थांबविण्यासाठी कायम स्वरूपी उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Severe water shortage in Dab's Umranipada