युवकाकडून सात दुचाकी हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 12:31 IST2020-03-19T12:30:31+5:302020-03-19T12:31:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चोरीची दुचाकी विक्रीसाठी आलेल्या २२ वर्षीय युवक विसरवाडीत आला होता. दरम्यान त्याला सापळा रचून ...

Seven wheels were recovered from the youth | युवकाकडून सात दुचाकी हस्तगत

युवकाकडून सात दुचाकी हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : चोरीची दुचाकी विक्रीसाठी आलेल्या २२ वर्षीय युवक विसरवाडीत आला होता. दरम्यान त्याला सापळा रचून स्थानिक अन्वेषण शाखेच्या पोलीसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून सात चोरीच्या दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या.
साक्री तालुक्यातील देवळीपाडा येथील रहिवासी गणेश अशोक गवळी हा २२ वर्षीय युवक मागील दोन वर्षांपासून नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून दुचाकी चोरीचे काम करीत होता. त्याने चोरी केलेल्या दुचाकींपैकी एक दुचाकी विसरवाडी येथे कमी किमतीत विकण्यासाठी आणली होती. याची माहिती स्थानिक अन्वेषण शाखेच्या पोलीसांना मिळाली, या माहितीनुसार या शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विसरवाडी येथे सापळा रचून शहनिशा केली. त्यात गणेश गवळी याने हिरो कंपनीची स्मार्ट स्प्लेंडर ही दुचाकी आणल्याचे आढळून आले. याबाबत त्याला विचारणा केली असता. त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. परंतु त्याला विश्वासात घेत माहिती विचारली. त्यात त्याने ठिकठिंकाणाहून दुचाकी चोरल्याचे कबुल केले. त्यातील सातही दुचाकी पोलीसांनी ताब्यात घेतल्या. ही कारवाई स्थानिक अन्वेषणचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, महेंद्र नगराळे, शांतिलाल पाटील, राकेश वसावे, जितेंद्र तोरवणे यांनी केली.

Web Title: Seven wheels were recovered from the youth