शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

उच्छल येथील पोल्ट्रीत पहिल्या दिवशी सात हजार कोंबड्या नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : महाराष्ट्र राज्याच्या शेजारील नवापूर अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील गुजरात राज्यातील उच्छल नॅशनल पोल्ट्रीत बर्ड ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : महाराष्ट्र राज्याच्या शेजारील नवापूर अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील गुजरात राज्यातील उच्छल नॅशनल पोल्ट्रीत बर्ड फ्लूची लागण झाल्याने दक्षिण गुजरात राज्यातील पशुसंवर्धन विभागाचा पथकांमार्फत किलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी सात हजार कुकुट पक्षी नष्ट करण्यात आले. गुजरात राज्यातील नॅशनल पोल्ट्रीचा बर्ड फ्लूचा अहवाल भोपाल प्रयोगशाळेतून पॉझिटिव्ह आल्याने गुजरात पशुसंवर्धन विभागाने किलिंग ऑपरेशन सुरू केले आहे. गुजरात प्रशासनाने महसूल व पशुसंवर्धन विभागाच्या नेतृत्वाखाली किलिंग ऑपरेशन सुरू केले आहे. गुजरात राज्यातील तापी, सुरत, नवसारी, डांग जिल्ह्यातील एकूण १७ पथक असून त्यात साधारण ९० पशुसंवर्धन विभागातील कर्मचार्‍यांना टॅमी फ्लूचा गोळ्या देऊन पीपीई किट परिधान करून किलिंग ऑपरेशन साठी रवाना करण्यात आले. तापी जिल्ह्यातील उच्छल येथील नॅशनल पोल्ट्रीतील दोन शेड मध्ये एकूण १७ हजार कुकुट पक्षी व २० हजार अंडी आहे. येथील ऑपरेशन मंगळवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास सुरू केले. पहिल्या टप्प्यात ७ हजार कुकुट पक्षी नष्ट करण्यास सुरूवात झाली. रात्री उशिरापर्यंत ७ हजार कुकुट पक्षी नष्ट करण्यात आले आहे. बुधवारी उर्वरित दहा हजार पक्षी नष्ट करण्यात येणार असल्याची माहिती गुजरात राज्यातील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.यावेळी गुजराचे पशुसंवर्धन उपसंचालक डॉ. अमरनाथ वर्मा, राज्य इएमओ डॉ.उमंग मिश्रा, राज्य जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षद पटेल, उच्छल पोलीस उपनिरीक्षक राजकुमार लोह, मयुर चौधरी,  तालुका पशुसंवर्धन अधिकारी डाॅ, विजय परमार यांच्यासह जिल्हा व तालुका आरोग्य पथकाने उच्छल येथील पोल्ट्री फार्मला भेट दिली. बर्ड फ्लू आणि पुढील किलिंग ऑपरेशन मोहिमेसाठी आरोग्यविषयक कामांबाबत टीमला मार्गदर्शन करण्यात आले. उच्छल तालुक्यात एकूण तीन पोल्ट्री आहेत. इतर दोन पोल्ट्री तीन किलोमीटर अंतरावर    आहे. नवापूर शहरातील अनेक पोल्ट्रीना यापासून धोका होऊ    शकतो. एक किलोमीटर त्रिज्येतील   जर नवापूर शहरातील पोल्ट्री येत असतील त्यातील पक्षी व अंडी नष्ट करण्यात येतील अशी माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली आहे.  

अधिकारी पहाणीस आले नसल्याने नाराजीउच्छल मधील गुजरात राज्यातील पहिले किलिंग ऑपरेशन गुजरात राज्यातील पहिला बर्ड फ्लू अहवाल उच्छल शहरातील नॅशनल पोल्ट्रीचा आला त्यानंतर गुजरात तापी प्रशासनाने तब्बल ३६ तासानंतर कारवाईला सुरुवात केली. या कारवाईत पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व उच्छल तहसीलदार यांचा मार्गदर्शन किलिंग ऑपरेशन घेण्यात येत आहे. नवापुरचा बर्ड फ्लूची तीव्रता उच्छलची अधिक असताना देखील तापी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी,पोलीस अधीक्षक यांनी नेशनल पोल्ट्रीत पाहणी करण्यास आले नसल्याचे पोल्ट्री व्यावसायिकांनी सांगितले. नवापूर परिसरातील नेशनल पोल्ट्री सर्वात जुनी पोल्ट्री आहे. १९७२ साली टिमोल परिवाराने कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला होता.यातील दोन शेडचे बांधकाम जुन्या पद्धतीने लाकडाचे आहे. तर दोन शेड आधुनिक आहे.महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागात आहे. २००६ मध्ये नेशनल पोल्ट्रीत बर्ड फ्लूची लागण झाली होती. त्यानंतर पुन्हा १५ वर्षात लागण झाली आहे.