सात भरारी पथके ठेवतील बोगस बियाणे व खते विक्रीवर नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:30 IST2021-05-13T04:30:56+5:302021-05-13T04:30:56+5:30

या भरारी पथकांनी वेळोवेळी कृषी निविष्ठा विक्री केंद्रांना भेटी देऊन तपासणी करण्याचे आणि जादा दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर वेळीच ...

Seven flying squads will control the sale of bogus seeds and fertilizers | सात भरारी पथके ठेवतील बोगस बियाणे व खते विक्रीवर नियंत्रण

सात भरारी पथके ठेवतील बोगस बियाणे व खते विक्रीवर नियंत्रण

या भरारी पथकांनी वेळोवेळी कृषी निविष्ठा विक्री केंद्रांना भेटी देऊन तपासणी करण्याचे आणि जादा दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर वेळीच योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भरारी पथकांमार्फत रासायनिक खते व कीटकनाशके याबाबत उगम प्रमाणपत्र तपासणी, मुदतबाह्य निविष्ठांची विक्री रोखणे तसेच ई-पॉस मशीनवरील खताचा ताळमेळ घेणे इ. तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीमध्ये त्रुटी आढळून आल्यास विक्रेत्यावर कारवाई करण्यात येईल. बोगस, अनधिकृत बियाणे साठ्याचा शोध घेऊन

जप्तीची कारवाई आणि अधिसूचित नसलेले बियाणे, खते, कीटकनाशके इ. बाबत तत्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पथकांना देण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांना आपल्या तक्रारी नोंदविण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय येथे संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या समस्येबाबत मोहीम अधिकारी एम. जी. विसपुते व जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक एन.डी. पाडवी यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे

आणि कृषी विकास अधिकारी प्रदीप लाटे यांनी कळविले आहे.

Web Title: Seven flying squads will control the sale of bogus seeds and fertilizers