शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

सात भरारी पथके ठेवतील बोगस बियाणे व खते विक्रीवर नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:29 IST

नंदुरबार : जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके गुणवत्तापूर्ण व रास्त भावात उपलब्ध होण्यासाठी तसेच समस्या निराकरणासाठी जिल्हास्तरावर एक ...

नंदुरबार : जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके गुणवत्तापूर्ण व रास्त भावात उपलब्ध होण्यासाठी तसेच समस्या निराकरणासाठी जिल्हास्तरावर एक व तालुकास्तरावर सहा अशी सात भरारी पथके व नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

या भरारी पथकांनी वेळोवेळी कृषी निविष्ठा विक्री केंद्रांना भेट देऊन तपासणी करण्याचे आणि जादा दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर वेळीच योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भरारी पथकांमार्फत रासायनिक खते व कीटकनाशके याबाबत उगम प्रमाणपत्र तपासणी, मुदतबाह्य निविष्ठांची विक्री रोखणे तसेच ई-पॉस मशीनवरील खताचा ताळमेळ घेणे इ. तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीमध्ये त्रुटी आढळून आल्यास विक्रेत्यावर कारवाई करण्यात येईल. बोगस, अनधिकृत बियाणे साठ्याचा शोध घेऊन जप्तीची कारवाई आणि अधिसूचित नसलेले बियाणे, खते, कीटकनाशके इ. बाबत तत्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पथकांना देण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांना आपल्या तक्रारी नोंदविण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय येथे सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या समस्येबाबत मोहीम अधिकारी एम. जी. विसपुते व जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक एन. डी. पाडवी यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे आणि कृषी विकास अधिकारी प्रदीप लाटे यांनी कळविले आहे.