शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिक समन्वय संनियंत्रण समिती गठित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:31 IST

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांच्या स्वाक्षरीने नंदुरबार येथील समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांनी समिती गठित करण्याचे आदेश काढले आहेत. ...

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांच्या स्वाक्षरीने नंदुरबार येथील समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांनी समिती गठित करण्याचे आदेश काढले आहेत. जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी, जिल्हाधिकारी यांनी व्यासपीठ तयार करून दिल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक संघ व संस्थांकडून जिल्हाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत. माता-पिता व ज्येष्ठ नागरिक यांच्या निर्वाह व कल्याणासाठी संविधानात हमी दिलेल्या व मान्य केलेल्या अधिक परिणामकारक तरतुदींची व त्याच्याशी संबंधित आणि तदअनुषंगिक बाबींची तरतूद करण्यासाठी अधिनयम २००७ देशात लागू करण्यात आला. अधिनियमाच्या प्रभावी अंमबजावणीसाठी सामाजिक न्याय व विशेष साहाय विभागाने अधिसूचित केल्यानुसार संनियंत्रण समिती गठित करण्याचे नमूद आहे. जिल्हा समितीची रचना, अशासकीय सदस्यांचा पदावधी, कार्यपद्धतीचे नियम आणि इतर आनुषंगिक बाबी राज्य शासनाने एका आदेशाद्वारे विनिर्दिष्ट केलेले आहे. त्या आनुषंगाने समितीची रचना करण्यात आली आहे.

समितीच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी राहणार असून, सहअध्यक्षपदी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, नंदुरबार समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त तर सदस्य म्हणून जिल्हा समाज कल्याण अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्यासह अशासकीय सदस्य म्हणून संत नरहरी महाराज ज्येष्ठ नागरिक मंडळाचे उपाध्यक्ष व सरदार पटेल ज्येष्ठ नागरिक संघाचे सल्लागार ॲड. गोविंद विठ्ठल पाटील, आई-वडील व ज्येष्ठ नागरिक कल्याण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बारकू नवल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.