आष्टे शाळेची तंबाखूमुक्त अभियानांतर्गत बालपरिषदेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:32 IST2021-01-23T04:32:36+5:302021-01-23T04:32:36+5:30

बालपरिषदेमार्फत मुख्याध्यापक कैलास लोहार तंबाखूमुक्तीसाठी विविध उपक्रम राबवतात. त्यासाठी पालकांना पत्र, पालक भेट, पानटपरी, किराणा दुकान यांना भेट व ...

Selection of Ashte School for Children's Council under Tobacco Free Campaign | आष्टे शाळेची तंबाखूमुक्त अभियानांतर्गत बालपरिषदेसाठी निवड

आष्टे शाळेची तंबाखूमुक्त अभियानांतर्गत बालपरिषदेसाठी निवड

बालपरिषदेमार्फत मुख्याध्यापक कैलास लोहार तंबाखूमुक्तीसाठी विविध उपक्रम राबवतात. त्यासाठी पालकांना पत्र, पालक भेट, पानटपरी, किराणा दुकान यांना भेट व त्यातून तंबाखूजन्य पदार्थ न विकण्यासाठी विनंती शाळेमार्फत करण्यात येते. त्यासाठी गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर, केंद्रप्रमुख हिरामण गायकवाड, रवींद्र गोसावी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. शाळेतील शिक्षक दौलत रामोळे, राजेंद्र सूर्यवंशी, संगीता चौधरी, मधुकर कांबळे, दिलीप वळवी यांचेही सहकार्य लाभते. तंबाखूमुक्त अभियान उपक्रमांतर्गत बालपरिषदेसाठी मुख्याध्यापक कैलास लोहार यांच्यासह कनक विलास मराठे, लक्ष्मण सुभाष सैंदाणे, सावित्री राजू पाडवी, हर्षल चव्हाण व अश्विनी मका मोरे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. मोड येथील सरपंच जयसिंग माळी, उपसरपंच श्यामभाऊ राजपूत, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम मराठे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष घनश्याम वानखेडे, उपाध्यक्ष सुनीता ठाकरे, पत्रकार गुलाबसिंग राजपूत व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

Web Title: Selection of Ashte School for Children's Council under Tobacco Free Campaign