कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस लसीकरण केंद्रात उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:31 IST2021-05-12T04:31:22+5:302021-05-12T04:31:22+5:30

एक मे पासून १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थींना कोविड लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार कोव्हॅक्सिन लसीचे डोस ...

A second dose of covacin is available at the vaccination center | कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस लसीकरण केंद्रात उपलब्ध

कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस लसीकरण केंद्रात उपलब्ध

एक मे पासून १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थींना कोविड लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार कोव्हॅक्सिन लसीचे डोस या वयोगटासाठी पुरविण्यात आले होते. मात्र, ४५ पेक्षा अधिक वयोगटातील दुसरा डोस देय असलेल्या लाभार्थींची संख्या वाढत असल्याने राज्याच्या निधीतून पुरवठा केलेल्या कोव्हॅक्सिन डोसेसपैकी जिल्ह्यात शिल्लक असलेल्या लसीचा वापर दुसरा डोस देय असलेल्या ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांसाठी करण्याचे आदेश आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी दिले आहेत.

या आदेशाची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली असून, ४५ वर्षांवरील लाभार्थींनी पूर्वी ज्या केंद्रावर कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला होता, त्याच केंद्रावर दुसरा डोस उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके यांनी केले आहे.

Web Title: A second dose of covacin is available at the vaccination center