शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

सलग दुसऱ्या दिवशी आठ कर्मचाऱ्यांवर वेतन कपातीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:31 IST

तळोदा प्रकल्प कार्यालयात खावटी अनुदान योजनेसंबधी ऑनलाईन फॉर्म भरणे, प्रकल्प अधिकारी लेव्हलला फॉर्म अप्रोवल करणे, फॉर्म संपादित करणे इत्यादी ...

तळोदा प्रकल्प कार्यालयात खावटी अनुदान योजनेसंबधी ऑनलाईन फॉर्म भरणे, प्रकल्प अधिकारी लेव्हलला फॉर्म अप्रोवल करणे, फॉर्म संपादित करणे इत्यादी कामांसाठी प्रकल्प कार्यालयाच्या आस्थापनेवर कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्या असून खावटी अनुदान योजनेचे कामाला गती मिळाली आहे.

या कामकाजासाठी नियुक्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी शुक्रवारी सहा कर्मचारी गैरहजर होते. प्रकल्प अधिकारी विकास मीना यांनी पदभार घेतल्याच्या पहिल्याच दिवशी या गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर एक दिवसाचे वेतन कपातीची कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या कामासाठी नियुक्त असणारे कर्मचारी सलग दुसऱ्या दिवशीही गैरहजर राहिले. या गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या शनिवारी आठवर गेली होती. त्यामुळे प्रकल्प अधिकारी मीना यांनी सलग दुसऱ्या दिवशीही आठ कर्मचाऱ्यांचे एका दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रकल्प अधिकारी कार्यालयात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, वेतन कपातीच्या आदेशाची प्रत लेखा अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे लेखाधिकारी तसेच तळोदा, अक्कलकुवा, धडगाव येथील उपकोषागार अधिकारी यांना पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे. त्यात एप्रिल २०२१ चे वेतन देयक प्राप्त झाल्यानंतर संबंधित कर्मचारी यांचे आदेशानुसार संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन कपातीची पडताळणी करूनच वेतन देयक पारित करावीत, अशा सूचना दिलेल्या आहेत.

रजेसाठी पूर्वपरवानगी अत्यावश्यक

प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना रजेवर जाण्यापूर्वी पूर्वपरवानगी घेणे अत्यावश्यक असून त्याबाबतचे परिपत्रक प्रकल्प अधिकारी विकास मीना यांनी काढले आहे. या कार्यालयात कार्यरत अधिकारी व कर्मचारी रजेवर जाण्यापूर्वी प्रकल्प अधिकारी व संबंधित कक्ष अधिकारी किंवा सहाय्यक प्रकल्प अधिकारी (प्रशासन) व कार्यालयीन अधीक्षक यांच्याकडे पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते. परंतु प्रकल्प कार्यालयातील रजेवर जाणारा कर्मचारी इतर कर्मचाऱ्यांकडे रजेचा अर्ज देऊन परस्पर रजेवर जात असल्याने या कार्यालयातील कार्यालयीन कामकाजात अडचण निर्माण होत असते. रजेवर जाण्यापूर्वी प्रकल्प अधिकारी, कक्ष अधिकारी, सहायक प्रकल्प अधिकारी (प्रशासन), कार्यालयीन अधीक्षक यांच्याकडून रजा मंजूर करूनच रजेवर जाण्याची कार्यवाही करावी. परस्पर अर्ज इतर कर्मचाऱ्यांकडे किंवा व्हाॅट्सअप सोशल मीडियावर दिल्याचे निदर्शनास आल्यास अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांची रजा मंजूर न करता विनावेतन केली जाईल याची नोंद घ्यावी, असे यासंबंधी काढलेल्या परिपत्रकात प्रकल्प अधिकारी मीना यांनी म्हटले आहे.

पूर्व परवानगीशिवाय गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल. तसे होत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

-विकास मीना, प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा