इंडियन पोस्ट बँक जागेच्या शोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 01:17 PM2019-01-01T13:17:29+5:302019-01-01T13:17:33+5:30

केंद्राच्या महत्वाकांक्षी योजनेची स्थिती : नंदुरबारात जागा नसल्याने नवापूरात शाखा

In search of the Indian Post Bank space | इंडियन पोस्ट बँक जागेच्या शोधात

इंडियन पोस्ट बँक जागेच्या शोधात

Next

नंदुरबार : शंभरटक्के केंद्राचा वाटा असलेली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना ‘इंडियन पोस्ट बँक’ला नंदुरबार शहरात जागा उपलब्ध होत नसल्याची स्थिती आह़े त्यामुळे जिल्ह्याचे ठिकाण सोडून नाईलाजास्तव बँकेची मुख्य शाखा नवापूर येथे सुरु करण्यात आली  आह़े
साधारणत: 2 सप्टेंबर 2018 रोजी नंदुरबारात इंडियन पोस्ट बँक योजनीची सुरुवात करण्यात आली़ परंतु शहरात पोस्ट बँकेसाठी जागा उपलब्ध होत नसल्याने नवापूर येथे पोस्ट कार्यालयाच्या मालकीच्या जागेवर या योजनेच्या मुख्य शाखेचे उद्घाटन करण्यात आले आह़े गेल्या अनेक वर्षापासून नंदुरबार येथील पोस्ट कार्यालयदेखील एका भाडय़ाच्या इमारतीत सुरु असल्याचे सांगण्यात आले आह़े याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन इंडियन पोस्ट बँकेसाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी जोर धरु लागली आह़े 
ग्रामीण भागातील गुंतवणूकदारांचा वर्षानुवर्षे विश्वास लाभलेल्या पोस्ट खात्यातच इडियन पोस्ट बँकेची स्थापना करावी़ तसेच बँकेचे जाळे ग्रामीण तसेच दुर्गम भागात अद्याप पोहचलेले नसल्याने इंडियन पोस्ट बँकेव्दारे गुंतवणूकदारांना नवीन गुंतवणुकीचे साधन उपलब्ध व्हावे म्हणून या योजनेची सुरुवात करण्यात आली आह़े 
संपूर्ण भारतभरातील पोस्ट कार्यालयातच एक स्वतंत्र पोस्ट बँक तयार करण्यात आली आह़े याव्दारे गुंतवणूकदारांना बचत तसेच चालू खाते उघडता येणार आह़े
संपूर्ण पेपरलेस व्यवहार
इंडियन पोस्ट बँकचे सर्वात महत्वाचे वैशिष्टय़ म्हणजे याव्दारे चालणारे सर्व व्यवहार हे पेपरलेस असणार आहेत़ या बँकेत खाते उघडण्यासाठी गुंतवणूकदारांला कुठलेही कागदपत्र देण्याची गरज राहणार नाही़ केवळ आधार कार्ड व पॅन कार्ड नंबर सांगून बायोमॅट्रीक थमव्दारे बँकेत आपले खाते उघडणार आह़े आधार व पॅन सोबतच संबंधित व्यक्तीने आपला मोबाईल क्रमांक दिल्यास त्यावर एक ओटीपी क्रमांक येईल़ तो ओटीपी नंबर सांगितल्यावर त्याव्दारे बँक खाते उघडण्याची कार्यवाही करण्यात येणार आह़े बायोमॅट्रीक थम असल्याने व्यवहारात पारदर्शकता निर्माण होऊन विविध घोटाळ्यांनाही आळा बसणार आह़े ई-केवायसीव्दारे बँक खाते उघडण्यात येणार आह़े 
पोस्टमन्स्ना मिळणार प्रशिक्षण
प्रत्येक पोस्टमन्स्ना या योजनेंतर्गत एक डिव्हाईस देण्यात येणार आह़े त्याव्दारे दुर्गम भागात टपाल वाटप तसेच विविध कामांसाठी जाणा:या पोस्टमन्स्व्दारेही बँक खाते उघडण्यास मदत होणार आह़े या डिव्हाईसवर बायोमॅट्रीक थम करुन तसेच आवश्यक ती सर्व पूर्तता झाल्यावर घरबसल्या इंडियन पोस्ट बँकेत खाते उघडण्याची सोय उपलब्ध होणार आह़े याबाबत इंडियन पोस्ट बँकेतील कर्मचा:यांना धुळे येथे प्रशिक्षणही देण्यात आले आह़े जिल्हाभरात पोस्टाच्या सुमारे 200 शाखा डाकघर आहेत़ त्या सर्व ठिकाणी लवकरच इंडियन पोस्ट बँकेचा विस्तार  करण्यात येणार आह़े सुमारे चार महिन्यात जिल्हाभरातील सर्व शाखा डाकघरांमध्येही या योजनेंतर्गत पोस्ट बँक सुरु करण्यात येणार आह़े योजनेबाबत जनजागृती होत असून जिल्ह्यातील प्रत्येक शाखांमध्ये योजनेची फलके लावण्यात आलेली आह़े आपली बँक आपल्या दारी हे या योजनेचे ब्रीदवाक्य असून त्यानुसार दुर्गम भागातही आता घरबसल्या बँक खाते उघडणे शक्य होणार आह़े 

Web Title: In search of the Indian Post Bank space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.