शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञान प्रदर्शनाला अखेर निधी मिळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 12:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन येत्या शुक्रवारी प्रकाशा, ता.शहादा येथील सर्वोदय विद्या मंदिरात आयोजित करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन येत्या शुक्रवारी प्रकाशा, ता.शहादा येथील सर्वोदय विद्या मंदिरात आयोजित करण्यात आले आहे. या विज्ञान प्रदर्शनात जिल्हा परिषदेने प्रथमच आपल्या शेषफंडातून साधारण पाच लाखांचा निधी मंजूर केला आहे. साहजिकच नूतन पदाधिकाऱ्यांच्या या धोरणात्मक निर्णयाचे शिक्षण क्षेत्रात समाधान व्यक्त होत आहे. जिल्हास्तराबरोबरच तालुका पंचायत समित्यांनीदेखील निधीबाबत अशा ठोस निर्णय घ्यावा, अशी पालकांची अपेक्षा आहे.जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टीकोनास वाव देण्यासाठी दरवर्षी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमार्फत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाबरोबरच जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित केले जात असते. या प्रदर्शनात प्रत्येक तालुक्यामधील प्रथम तीन क्रमांकाने आलेल्या विद्यार्थ्यांचे उपकरण जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मांडले जात असते. परंतु विज्ञान प्रदर्शनास मोठा आर्थिक खर्च लागत असतो. परिणामी त्याचे आयोजन करण्यासाठी कोणतीही संस्था अथवा शाळा पुढे येत नसतात. बळजबरीने नाहक त्यांच्या माथी मारावे लागत असते. दबावापोटी कर्मचाऱ्यांनाही आर्थिक पदरमोड करावी लागत असते. साहजिकच आर्थिक बोजामुळे विज्ञान प्रदर्शनात उदासिनताच दिसून येत होती. केवळ औपचारिकता उरली होती. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन जिल्हा परिषद व पंचायत समित्यांनी तालुका व जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालकांकडून सातत्याने केली जात होती.जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाºयांनीदेखील याप्रकरणी सतत पाठपुरावा केला होता. तत्कालीन पदाधिकारी व अधिकारी उद्घाटन, समारोपाचा कार्यक्रमात तेवढ्यापुरते पोकळ आश्वासन देऊन वेळ मारून नेत होते. परंतु संघाच्या पदाधिकाºयांनी निधीची मागणी सतत लावून धरली होती. तथापि जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्षा अ‍ॅड.सीमा वळवी व पदाधिकाºयांनी जिल्ह्यातील शालेय शिक्षणाबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून विशेष लक्ष घातले आहे. त्यांनी जिल्हा परिषदेच्या शेषफंडातून यंदा आयोजित होणाºया जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निधीची तरतूद करून तब्बल पाच लाखांचा निधी मंजूर केला आहे.पदाधिकाºयांनी घेतलेल्या या धोरणात्मक निर्णयाचे ग्रामीण भागातील आदिवासी पालक, शिक्षक व मुख्याध्यापकांनी समाधान व्यक्त केले असून, यात सातत्य राखण्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे.जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी यंदापासून जिल्हा परिषदेने आपल्या शेष फंडातून का असेना निधीची तरतूद केल्यामुळे दिलासा मिळाला आहे. जिल्हा परिषदेप्रमाणेच पंचायत समित्यांनीदेखील तालुकास्तरावरील विज्ञान प्रदर्शनासाठी तरतूद करावी, अशी पालकांची मागणी आहे. कारण तालुका स्तरावरही विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करताना शाळांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. निधी उपलब्ध करून देण्याबाबत संबंधीत प्रशासन आणि पदाधिकारी नेहमीच आश्वासन देतात. मात्र त्यावर आजतागायत कार्यवाही झालेली नाही. यंदा पंचायत समिती पदाधिकाºयांनीही जिल्हा परिषदेच्या पदाधिकाºयांप्रमाणे सकारात्मकता दाखवून आपल्या फंडातून निधीची तरतूद करावी, अशी अपेक्षा आहे. जिल्हास्तरापेक्षा तालुकास्तरीय प्रदर्शनास जास्त निधीची आवश्यकता नाही. त्यामुळे पदाधिकाºयांनी आदिवासी विद्यार्थ्यांमधील दृष्टीकोनास वाव देण्यासाठी ठोस प्रयत्न करावे, अशी मागणी आहे.