शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
2
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
3
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
4
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
5
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
6
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
7
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
8
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
9
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
10
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
11
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
12
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
13
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
14
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
15
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
16
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
17
फुल क्रीम की टोंड मिल्क? तुमच्या आरोग्यासाठी कोणतं दूध चांगलं? खरेदी करण्यापूर्वी 'हे' फरक नक्की जाणून घ्या
18
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
19
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
20
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुक्तीचे समाधान अवघे २४ तासच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 13:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुक्तीचे समाधान जिल्हावासीयांना अवघे २४ तासच लाभू शकले. १८ रोजी सायंकाळी जिल्ह्यातील सर्व रुग्ण ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनामुक्तीचे समाधान जिल्हावासीयांना अवघे २४ तासच लाभू शकले. १८ रोजी सायंकाळी जिल्ह्यातील सर्व रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले आणि १९ रोजी रात्री एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. रजाळे, ता.नंदुरबार येथील हा ६४ वर्षीय रुग्ण असून तो मुंबई येथील कांदीवली भागातून आलेला आहे. जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी गेला असता तेथे दाखल करण्यात आले होते. त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. मंगळवारी रात्री अहवाल पॉझिटिव्ह आला. रुग्णाला लागलीच आयशोलेशन कक्षात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.

रजाळे येथे कोरोनाबाधीत रुग्ण असल्याचा अहवाल येताच प्रशासन तेथे दाखल झाले. रात्रीच उपाययोजना सुरू करण्यात आल्या.
रुग्णाच्या संपर्कातील पाच व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दुय्यम संपर्कातील ९ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. गावात जंतूनाशक फवारणी करण्यात आली आहे. बॅरीकेटींग देखील केली गेली आहे.


रजाळे येथील रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह येताच त्याच्या ट्रॅव्हल हिस्ट्रीची माहिती प्रशासनाने जाणून घेतली. रुग्ण कांदीवली येथे राहत होता. तेथून तो लॉकडाऊन शिथील होताच रजाळे येथे गावी आला. आल्यानंतर गावातच थांबला होता


रुग्णाने सिव्हील हॉस्पीटलमध्ये तपासणी केली. ताप उतरत नसल्याने दाखल करून घेण्यात आले. स्वॅब घेवून तपासणीला पाठविला होता. दोन दिवसांनी त्याचा अहवाल प्राप्त झाला.
पॉझिटिव्ह रुग्ण गावात आणखी कुठेकुठे फिरला, कुणाला भेटला, नंदुरबारात किंवा इतर ठिकाणी खाजगी दवाखान्यात तपासणीसाठी गेला होता का? यासह इतर अनेक बाबींचे उत्तरे येणे अद्याप बाकी आहेत.