शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

सैताण्याचे पाच जण क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 12:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील सैताणे येथे गुजरात राज्यातील सुरत येथून येऊन परत गेलेल्या एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील सैताणे येथे गुजरात राज्यातील सुरत येथून येऊन परत गेलेल्या एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे़ संबधित रुग्णावर सुरत येथे उपचार सुरु असल्याची माहिती मिळताच तालुका प्रशासनाने गावात भेट देत पाच जणांना नंदुरबारात तर तिघांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे़सैताणे येथील एक जण सुरत येथे नोकरी निमित्त स्थायिक आहे़ सहा दिवसांपूर्वी संबधित आईच्या उपचारांसाठी गावी आला होता़ आईची एन्जिओप्लास्टी करण्यात आल्यानंतर तो परत गेला होता़ येथून परत गेल्यानंतर त्याला सुरत येथे त्रास सुरु झाल्यानंतर स्वॅब रिपोर्ट घेण्यात आला होता़ तो पॉझिटिव्ह आल्यानंतर तेथील प्रशासनाने ही बाब नंदुरबार तालुका प्रशासनाला कळवली होती़ त्यानुसार तहसीलदार भाऊसाहेब थोरात, गटविकास अधिकारी अशोक पटाईत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ जे़एच़तडवी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी सैताणे गावात भेट देत माहिती घेतली होती़ याठिकाणी संबधित कोरोनाबाधिताच्या अती संपर्कात आलेल्या पाच जणांना तातडीने नंदुरबार येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात आले होते़ गावातील आणखी तिघांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ दरम्यान दुपारी याठिकाणी तालुका प्रशासनाच्या सूचनेनंतर तातडीने फवारणी करण्यात आली़ संपूर्ण गाव क्वारंटाईन करण्याऐवजी बाधित रुग्णाच्या घराच्या परिसर सील करण्यात आला़ नागरीक बॅरीकेड करुनही ते ओलांडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून या भागात काटे लावण्यात आल्याचे दिसून आले़दरम्यान क्वारंटाईन करण्यात आलेल्यांची प्रकृती चांगली असून गावात सर्वेक्षण मोहिम सुरु करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे़ या पाच जणांच्या संपर्कात आलेल्यांचाही तपास करण्यात येत असल्याची माहिती आहे़ ग्रामपंचायत प्रशासनाकडून दोन ते तीन वेळा फवारणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे़