शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच व युवकांनी दगड-माती उचलून रस्ता वाहतुकीसाठी केला सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील कोयलीविहीर कौलवी ते कौलवीमाळ रस्त्यावर सध्या होत असलेल्या पावसामुळे व मागीलवर्षी दरड ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील कोयलीविहीर कौलवी ते कौलवीमाळ रस्त्यावर सध्या होत असलेल्या पावसामुळे व मागीलवर्षी दरड कोसळून दगडी व मातीच्या मलबा साचला आहे. त्यामुळे घाट सेक्शनच्या रस्त्यावर वाहनधारकांना कसरत करीत वाहने काढावी लागत आहेत. अखेर शनिवारी पडत्या पावसातच कौलवीमाळचे सरपंच  व आठ-दहा युवकांनी मातीच्या मलबासह मोठमोठे दगड सरकवून रस्ता सुरळीत करण्याचा प्रय} केला.अक्कलकुवा तालुक्यातील व सातपुडय़ाच्या घाट सेक्शनचा भाग असलेल्या कोयलीविहीर कौलवी ते कौलवीमाळ या रस्त्यावर गेल्यावर्षी पावसामुळे मातीच्या मलबा कोसळून पडला होता. मात्र वाहने निघून जात असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. मात्र आठ दिवसांपूर्वी पुन्हा पावसामुळे या रस्त्यावर दरडी कोसळून मोठमोठे दगड व मातीचा मलबा काही ठिकाणी साचला होता. त्यामुळे कौलवीमाळसह देवपाडा, केलीपाडा-1, पाटीलपाडा, केलीपाडा-2  या भागातील वाहनधारकांना त्रासदायक होवून वाहतुकीसाठी अडचणी निर्माण होत होत्या. मात्र याकडे संबंधित विभाग लक्ष देत नसल्याने अखेर शनिवारी पडत्या पावसात कौलवीमाळचे सरपंच कौशल्या गुमानसिंग तडवी, गुमानसिग बिज्या तडवी, पाटीलपाडा व केलीपाडा येथील माकत्या राश्या तडवी, विज्या पारशी तडवी, सुरूपसिंग पारशी तडवी, अशोक विद्या तडवी, सुरूपसिंग काल्या वसावे, धिरसिंग ईरमा वसावे, फत्तेसिंग रावजी वसावे यांनी फावडे, टिकम, तगा:या व खराटे असे साहित्य घेऊन स्वत: पडत्या पावसात घाट सेक्शन रस्त्यावर कोसळलेला मातीचा मलबा मोठमोठे दगड सरकवून वाहतूक सुरळीत केली. पावसामुळे बुजल्या गेलेल्या रस्त्याच्या बाजूच्या गटारीदेखील साफ करून घाट सेक्शनचा रस्ता सुरळीत करण्यासाठी प्रय} केले.दरम्यान, कोयलीविहीर कौलवी ते कौलवीमाळ रस्त्यावर मागीलवर्षी कोसळलेल्या दरडीमुळे रस्त्यावर          साचलेली माती वर्षभर पडून होती. ही माती व दगड उचलण्यासाठी संबंधित विभागाकडून दुर्लक्ष झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील घाट सेक्शनसह इतर रस्त्यांवर पावसाळ्यात दरडी कोसळल्याने वाहतुकीचा प्रश्न  दरवर्षी निर्माण होतो. काही रस्त्यांवर मोठय़ा दरडी कोसळून मोठमोठे दगड रस्त्यावर येतात. अशा रस्त्यांवर आठ आठ दिवस वाहतूक बंद राहते. परिणामी नागरिकांची दळणवळणासाठी प्रचंड गैरसोय होते. कोयलीविहीर ते कौलवीमाळ रस्त्यावर मागीलवर्षी दरड कोसळल्याने रस्त्यावर मातीचा मलबा साचला होता. मात्र वर्षभर जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले. आता पुन्हा पावसाळ्यात माती व दगड रस्त्यावर पडल्याने वाहतूक बंद झाली होती. रस्त्यावर पडलेल्या या मातीवरुन वाहने घसरुन अपघातही होतात. मात्र वर्षभर संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. शेवटी कौलवीमाळचे सरपंच व युवकांनी माती व दगड उचलून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत केला. मात्र हा प्रश्न फक्त याच रस्त्याचा नसून अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील अनेक घाट सेक्शनच्या रस्त्यांवर पावसाळ्यात ही समस्या उद्भवते. त्यासाठी संबंधित विभागाने जेसीबी मशीनसह अद्ययावत स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज आहे.