शहादा येथे टाकाऊ वस्तूंपासून सॅनिटायझर तंबू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 01:03 PM2020-04-10T13:03:11+5:302020-04-10T13:03:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील कुलकर्णी रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी टाकाऊ वस्तंूपासून रूग्णालयात येणाºया रुग्णांसाठी तसेच कर्मचारी व डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी ...

Sanitizer Tent from Waste at Shahada | शहादा येथे टाकाऊ वस्तूंपासून सॅनिटायझर तंबू

शहादा येथे टाकाऊ वस्तूंपासून सॅनिटायझर तंबू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील कुलकर्णी रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी टाकाऊ वस्तंूपासून रूग्णालयात येणाºया रुग्णांसाठी तसेच कर्मचारी व डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सॅनिटायझर तंबू तयार केला आहे.
शहरातील कुलकर्णी रूग्णालयात रोज सुमारे ४०-५० रुग्ण तपासणी व शस्त्रक्रियेसाठी येतात. सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बाहेरून आलेल्या रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांमुळे रुग्णालयातील इतर रूग्णांना, रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना तसेच डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सॅनेटायझर तंबू लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा सॅनेटायझर तंबू रूग्णालयातील कर्मचाºयांनी टाकाऊ वस्तूपासून तयार केला आहे. फिटींगचे टाकाऊ पाईप, प्लास्टिक कागद, वापरलेल्या स्प्रे नळ्या, इलेक्ट्रीक लहान मोटर आदी साहित्य वापरून हा सॅनेटायझर तंबू तयार करण्यात आला आहे. रूग्णालयात प्रवेश घेणाºया प्रत्येक रुग्णाला हात धुण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असून हात धुतल्यावर रुग्णास सॅनिटाईज करण्यासाठी तंबूतून जावे लागते. तंबूतून जाताना चोहोबाजूने अंगावर औषध फवारणी होत असल्याने केसांवर, कपड्यांवर असलेले विषाणू नाश पावतात. रूग्णालयात रूग्णांना सोशल डिस्टन्सिंग ठेवावे म्हणून तशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणात सॅनिटाईज करण्यासाठी कुलकर्णी रूग्णालयातील सॅनेटायझर तंबूचा प्रयोग हा जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग आहे.

Web Title: Sanitizer Tent from Waste at Shahada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.