राजे शिवाजी विद्यालयात स्वच्छता अभियान व वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:30 IST2021-07-31T04:30:36+5:302021-07-31T04:30:36+5:30

याप्रसंगी बालसंस्कार, गायत्री मंत्र तसेच बुद्धीची देवता श्री गणेश स्तोत्र पठणाने विद्यार्थ्यांना आध्यात्मिक ऊर्जा मिळते. प्रत्येक विद्यार्थ्याने रोज सकाळी ...

Sanitation campaign and tree planting at Raje Shivaji Vidyalaya | राजे शिवाजी विद्यालयात स्वच्छता अभियान व वृक्षारोपण

राजे शिवाजी विद्यालयात स्वच्छता अभियान व वृक्षारोपण

याप्रसंगी बालसंस्कार, गायत्री मंत्र तसेच बुद्धीची देवता श्री गणेश स्तोत्र पठणाने विद्यार्थ्यांना आध्यात्मिक ऊर्जा मिळते. प्रत्येक विद्यार्थ्याने रोज सकाळी लवकर उठून सेवा केली तर त्याचे मनावर व शरीरावर योग्य परिणाम दिसून येतात. वर्गात गुरुंना सन्मान दिला पाहिजे, गुरु आपल्या भल्यासाठीच सांगतात. संकटकाळात गुरुचा उपदेश कामात येतो व वाईट मार्गापासून परावृत्त करतात. स्वच्छता ही काळाची गरज असून, आपला परिसर स्वच्छ ठेवल्याने मन प्रसन्न राहते. सर्व महिला व पुरुष सेवेकऱ्यांनी शाळेचा परिसर स्वच्छ केला व कृतीतून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. मुख्याध्यापक रवींद्र पाटील व सर्व शिक्षकांचा सत्कार करून विद्यार्थ्यांपुढे आदर्श निर्माण केला. वृक्षारोपण करून धरती मातीचे ऋण आपण प्रत्येकाने फेडले पाहिजे. प्रत्येकाने दरवर्षी एक झाड लावून त्याला वाढवून संगोपन केल्यास ही सृष्टी सुजलाम‌् सुफलाम‌् होईल. मुख्याध्यापक रवींद्र पाटील यांनी स्वामी समर्थ केंद्राकडून होणाऱ्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमास शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Sanitation campaign and tree planting at Raje Shivaji Vidyalaya