शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार तालुक्यातील ग्रामीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:22 IST

नंदुरबार : लॉकडाऊननंतर लालपरीची चाके धावू लागली असताना नंदुरबार तालुक्यातील अनेक गावांमध्ये अद्यापपर्यंत बससेवा सुरू झालेली नाही. तसेच ...

नंदुरबार : लॉकडाऊननंतर लालपरीची चाके धावू लागली असताना नंदुरबार तालुक्यातील अनेक गावांमध्ये अद्यापपर्यंत बससेवा सुरू झालेली नाही. तसेच थांबा असतानाही त्याठिकाणी बसेस थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. म्हणून नंदुरबार आगाराने ग्रामीण भागातील बससेवा पूर्ववत सुरू करावी व चालक आणि वाहकांना थांब्याच्या ठिकाणी बसेस थांबविण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी राष्ट्रीय बंजारा परिषदेने केली आहे.

याबाबत नंदुरबार आगार प्रमुख मनोज पवार यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, कोरोनामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत सहा महिने बससेवा बंद होती. आता शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्य परिवहन महामंडळाची बससेवा सुरू झाली आहे. सर्वसामान्यांची वाहिनी असलेली लालपरी पुन्हा रस्त्यावर धावू लागली आहे. परंतु नंदुरबार तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांच्या बससेवा अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. तसेच थांबा असतानाही त्याठिकाणी बसेस थांबत नाही. त्यामुळे प्रवाशांना अन्य वाहनांचा आधार घेऊन शहर व जिल्ह्याच्या ठिकाणी ये-जा करावी लागत आहे. नंदुरबार तालुक्यातील वंजारीपाडा, चिकीनीदगडी, गिरीशगाव, फुलसरा, सुंदरदे, करणखेडा, आदी गावांना बसथांबा आहे. याठिकाणी प्रवासी बसेसची प्रतीक्षा करतात. परंतु ये-जा करणार्‍या बसेस त्याठिकाणी थांबत नाहीत. तसेच काही गावांसाठी अद्यापही बससेवा पूर्ववत सुरू झालेली नाही. यामुळे शेतकरी, नागरिक व विद्यार्थ्यांची गैरसोय होऊन त्रास सहन करावा लागत आहे. नंदुरबार तालुक्यातील ग्रामीण भागातील बससेवा पूर्ववत सुरू करावी. त्याचबरोबर थांब्याच्या ठिकाणी बसेस थांबविण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष मिलीन जाधव, जिल्हा उपाध्यक्ष भीम राठोड, जिल्हा कार्याध्यक्ष गुड्डू राठोड, नंदुरबार तालुकाध्यक्ष आकाश चव्हाण, शहराध्यक्ष विजय राठोड, सदस्य आशिष रामराजे, आदींनी केली आहे.