शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना चाचण्यांबाबत नियमावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 13:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हाबाहेरून आलेल्या व्यापारी, विक्रेते तसेच इतरांना कोविडची कुठलीही लक्षणे नसल्यास त्यांची कोविड चाचणी होणार ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हाबाहेरून आलेल्या व्यापारी, विक्रेते तसेच इतरांना कोविडची कुठलीही लक्षणे नसल्यास त्यांची कोविड चाचणी होणार नाही असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. चाचण्यांची संख्या कमी करणे आणि प्रशासनावरील ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना चाचण्यांची वाढणारी संख्या, त्यामुळे वाढणारा खर्च आणि प्रशासनावरील ताण यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. कोणतीही लक्षणे नसलेल्यांचेही स्वॅब घेण्यात येतात. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढते. परिणामी लक्षणे असलेल्या लोकांच्या चाचणी अहवालांना उशीर होतो ही बाब लक्षात घेता आता एकाच रुग्णाच्या दोन ते तीन चाचण्या होणार नाहीत. ज्या व्यक्तीच्या उपचारासाठी त्वरीत चाचणीची गरज असेल त्यांची अ‍ॅण्टीजन चाचणी होईल.
आरटीपीसीआर चाचणी ही ज्यांना लक्षणे आहेत परंतु ज्यांची अ‍ॅण्टीजन चाचणी निगेटिव्ह आली अशा लोकांचीच होइल. बाधीत रुग्णाच्या अगदी जवळच्या संपर्कातील व्यक्तीचीही आरटीपीसीआर चाचणी करता येईल. प्रसुतीसाठी आलेल्या महिला, अत्यावश्यक शस्त्रक्रियासाठी येणारे रुग्ण यांची ट्रूनेट चाचणी करण्यात येईल. जेथे ट्रूनेटची सुविधा नसेल तेथे अ‍ॅण्टीजन चाचणी करता येईल.
यामुळे नंदुरबारात चाचण्यांची वाढणारी संख्या, अहवालांची वेटींग यावर यामुळे निर्बंध येऊ शकणार आहेत. शासनाचे दोन दिवसांपूर्वी हे आदेश काढले आहेत.