शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील वाहतूक झाली जीवघेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : शेवाळी ते नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गावरील तळोदा ते अक्कलकुवा ते गुजरात हद्दीपर्यंतच्या रस्त्यावर जागोजागी ...

लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : शेवाळी ते नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गावरील तळोदा ते अक्कलकुवा ते गुजरात हद्दीपर्यंतच्या रस्त्यावर जागोजागी मोठ मोठे खड्डे निर्माण झाले असून, वाहनधारकांना ते धोकेदायक ठरत आहेत. त्यात पावसामुळे भर होवून या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून रस्त्यावर जणू तलावच निर्माण झाला आहे, असे दिसून येत आहे. हे धोकेदायक खड्डे अपघाताला कारणीभूत ठरू पहात आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून त्वरित दुरूस्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शेवाळी ते नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गावरील तळोदावळण रस्त्यापासून सोमावल फाटा, नळगव्हाण फाटा, शिर्वे फाटा, मोदलपाडा फाटा, वाण्याविहीर फाटा, पिपरीपाडा फाटा, मोलगी नाका, अक्कलकुवा व सोरापाडा दरम्यान असलेल्या या वरखेडी नदीवरील पुल, सोरापाडा रोड, खापर, नवापाडा हद्द या दरम्यानच्या महामार्गावर पावसाळ्यापूर्वीच जागोजागी खड्डे निर्माण होवून वाहनधारकांना त्रासदायक झाले होते. वाहनधारकांना या महामार्गावर तळोदा ते अक्कलकुव्या दरम्यान वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. त्यातच खड्ड्यात पावसाचे पाणी साचून महामार्गावरच जणू तलाव निर्माण झाल्याने या मोठमोठ्या खड्ड्यात चिखलमय पाणी साचून समोरून येणाऱ्या वाहनामुळे अंगावर उडणार नाही याची काळजी घेताना वाहनधारकांना डोकेदुखी ठरत आहे.
अक्कलकुवा ते सोरापाडा दरम्यान असलेल्या वरखेडी नदीवरदेखील मोठमोठे खड्डे पडले असून पूल अगोदरच कमकुवत झाला आहे. या पुलावर असलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून तो धोकेदायक ठरू पाहात आहे. या पुलावरील वाहनांची वर्दळ, त्यात पादचाऱ्यांना मार्गक्रमण करताना मोठे वाहन आले की, जीवमुठीत धरून मार्ग काढावा लागतो. या पुलावरून ये-जा करणाºया पादचाºयांतर्फे पादचारी पुलाची मागणी वेळोवेळी केली जात असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वास्तविक अक्कलकुवा शहरवासीयाचे श्रद्धास्थान असलेली कालिका माता मंदिर, महादेव मंदीर, हनुमान मंदिर हे सोरापाड्यात एकाच ठिकाणी असल्याने सकाळ-संध्याकाळ दर्शनासाठी भाविकांची वर्दळ असते. तसेच शाळा सुरू असताना सावित्रीबाई विद्यालय, रूरल फाऊंडेशनचे विद्यालय, डी.एड. कॉलेज, कला, वाणिज्य व वरिष्ठ महाविद्यालय, मुला-मुलींचे वसतीगृ असल्याने याठिकाणी जाण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने सोरापाडा नदीवर पादचारी पुलाची मागणी आहे.