शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

हातगाड्यांवर कारवाई करुन रस्ता सुरक्षा सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 11:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात रस्ते सुरक्षा सप्ताहाला ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात रस्ते सुरक्षा सप्ताहाला प्रारंभ करण्यात आला आहे़ सप्ताहाच्या प्रारंभीच शहर वाहतूक शाखेने शहरात अडथळा करणाऱ्या हातगाड्यांवर कारवाईचा सपाटा सुरु केला असताना वळणरस्त्याने भरधाव जाणाºया वाळू वाहतूक करणाºया ट्रकांसह इतर वाहनांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले आहे़काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालय रस्ते सुरक्षा समितीने देशातील रस्ते अपघातांबाबत गंभीर निष्कर्ष नोंदवत किमान १० टक्के अपघात कमी व्हावेत यासाठी त्या-त्या यंत्रणांना उपाय योजना करण्याचे आदेश दिले होते़ त्यानुसार जिल्ह्यातील रस्त्यांवरुन धावणाºया वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे़ यात नगरपालिका हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग वळणरस्त्यांवरुन धावणारी एन श्रेणीतील अवजड वाहने अर्थात मालवाहू ट्रकचा वेग हा ताशी ३० किलोमीटरपेक्षा अधिक नसावा़ हा वेग ६० पेक्षा अधिक असल्यास कारवाई करणे सक्तीचे आहे़ यासाठी जिल्हा वाहतूक शाखेला देण्यात आलेल्या इंटरसेप्टर व्हेईकलमधील स्पीड गनचा वापर करुन कारवाई करण्याचे आदेश आहेत़ परंतू गेल्या दोन दिवसांपासून संबधित यंत्रणा शहरात वाहतूकीला अडथळा ठरणाºया हातगाड्यांवर कारवाई करत रस्ते सुरक्षा सप्ताह राबवत आहेत़ यातून शहरातील वाहतूक सुरळीत होत असली तरी शहराबाहेरील वळण रस्त्यावर जीव मुठीत धरुन चालणाºया नागरिकांचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे़गेल्या आठवड्यात वाळू वाहून नेणाºया ट्रकच्या धडकेत मॉर्निंग वॉक करणाºया नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतरही प्रशासनाने या वाहनांवर कोणतीही कारवाई केलेली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़

शहर वाहतूक शाखेने रस्ता सुरक्षा सप्ताह सुरु झाल्यानंतर शनिवारी १० तर रविवारी ११ हातागाडी लावणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई केली होती़ ही कारवाई सुरुच राहणार असल्याने शहरातील अनेक भागात शिस्तीत हातगाड्या लागल्याचे सायंकाळी दिसून आले़ दरम्यान कारवाई करण्यात आलेल्या सर्व २१ जणांना वाहतूक शाखेकडून नोटीसा देण्यात आल्या असून त्यांच्यावर न्यायालयात दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़

शहरातून शेवाळी ते नेत्रंग आणि विसरवाडी सेंधवा असे दोन महामार्ग जातात़ महामार्गाने प्रवास करणारी वाहने ही नवापुर चौफुली ते तळोदा रस्त्यापर्यंतचा वळणरस्ता उपयोगात आणत आहेत़ या वळणरस्त्याची त्रिज्या ही ५० मीटरपेक्षा कमी असल्याने याठिकाणी वाहनाचा वेग हा ताशी ३० किलो मीटरच असावा असा नियम आहे़ परंतू या मार्गाने धावणाऱ्या अवजड वाहनांसह इतर वाहनांचा वेग हा ८० ते १०० च्या घरात असतो़ यातून वाळू वाहतूक करणारे ढंपर आणि १२ चाकी ट्रक यांचा वेग जीवघेणा असताना त्यावर कारवाई करण्यात येत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे़ वेग मोजण्यासाठी यंत्रणांना अद्ययावत अशा चारचाकी वाहनासह साधनेही उपलब्ध करुन देण्यात आली असतानाही कारवाई झालेली नाही़