हातगाड्यांवर कारवाई करुन रस्ता सुरक्षा सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:49 AM2020-01-13T11:49:48+5:302020-01-13T11:49:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात रस्ते सुरक्षा सप्ताहाला ...

Road Safety Week by taking action on handguns | हातगाड्यांवर कारवाई करुन रस्ता सुरक्षा सप्ताह

हातगाड्यांवर कारवाई करुन रस्ता सुरक्षा सप्ताह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात रस्ते सुरक्षा सप्ताहाला प्रारंभ करण्यात आला आहे़ सप्ताहाच्या प्रारंभीच शहर वाहतूक शाखेने शहरात अडथळा करणाऱ्या हातगाड्यांवर कारवाईचा सपाटा सुरु केला असताना वळणरस्त्याने भरधाव जाणाºया वाळू वाहतूक करणाºया ट्रकांसह इतर वाहनांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले आहे़
काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालय रस्ते सुरक्षा समितीने देशातील रस्ते अपघातांबाबत गंभीर निष्कर्ष नोंदवत किमान १० टक्के अपघात कमी व्हावेत यासाठी त्या-त्या यंत्रणांना उपाय योजना करण्याचे आदेश दिले होते़ त्यानुसार जिल्ह्यातील रस्त्यांवरुन धावणाºया वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे़ यात नगरपालिका हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग वळणरस्त्यांवरुन धावणारी एन श्रेणीतील अवजड वाहने अर्थात मालवाहू ट्रकचा वेग हा ताशी ३० किलोमीटरपेक्षा अधिक नसावा़ हा वेग ६० पेक्षा अधिक असल्यास कारवाई करणे सक्तीचे आहे़ यासाठी जिल्हा वाहतूक शाखेला देण्यात आलेल्या इंटरसेप्टर व्हेईकलमधील स्पीड गनचा वापर करुन कारवाई करण्याचे आदेश आहेत़ परंतू गेल्या दोन दिवसांपासून संबधित यंत्रणा शहरात वाहतूकीला अडथळा ठरणाºया हातगाड्यांवर कारवाई करत रस्ते सुरक्षा सप्ताह राबवत आहेत़ यातून शहरातील वाहतूक सुरळीत होत असली तरी शहराबाहेरील वळण रस्त्यावर जीव मुठीत धरुन चालणाºया नागरिकांचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे़
गेल्या आठवड्यात वाळू वाहून नेणाºया ट्रकच्या धडकेत मॉर्निंग वॉक करणाºया नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतरही प्रशासनाने या वाहनांवर कोणतीही कारवाई केलेली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़


शहर वाहतूक शाखेने रस्ता सुरक्षा सप्ताह सुरु झाल्यानंतर शनिवारी १० तर रविवारी ११ हातागाडी लावणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई केली होती़ ही कारवाई सुरुच राहणार असल्याने शहरातील अनेक भागात शिस्तीत हातगाड्या लागल्याचे सायंकाळी दिसून आले़ दरम्यान कारवाई करण्यात आलेल्या सर्व २१ जणांना वाहतूक शाखेकडून नोटीसा देण्यात आल्या असून त्यांच्यावर न्यायालयात दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़


शहरातून शेवाळी ते नेत्रंग आणि विसरवाडी सेंधवा असे दोन महामार्ग जातात़ महामार्गाने प्रवास करणारी वाहने ही नवापुर चौफुली ते तळोदा रस्त्यापर्यंतचा वळणरस्ता उपयोगात आणत आहेत़ या वळणरस्त्याची त्रिज्या ही ५० मीटरपेक्षा कमी असल्याने याठिकाणी वाहनाचा वेग हा ताशी ३० किलो मीटरच असावा असा नियम आहे़ परंतू या मार्गाने धावणाऱ्या अवजड वाहनांसह इतर वाहनांचा वेग हा ८० ते १०० च्या घरात असतो़ यातून वाळू वाहतूक करणारे ढंपर आणि १२ चाकी ट्रक यांचा वेग जीवघेणा असताना त्यावर कारवाई करण्यात येत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे़ वेग मोजण्यासाठी यंत्रणांना अद्ययावत अशा चारचाकी वाहनासह साधनेही उपलब्ध करुन देण्यात आली असतानाही कारवाई झालेली नाही़

Web Title: Road Safety Week by taking action on handguns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.