शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

दोन महामार्गांना जोडणारा रस्ता ठरणार सोयीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विसरवाडी-सेंधवा महामार्गाचा दुसऱ्या टप्प्याचा मार्ग मोकळा झाला नसला तरी वळण रस्त्याच्या मार्ग मात्र मोकळा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विसरवाडी-सेंधवा महामार्गाचा दुसऱ्या टप्प्याचा मार्ग मोकळा झाला नसला तरी वळण रस्त्याच्या मार्ग मात्र मोकळा झाला आहे. समशेरपूर ते थेट करणखेडा हा साधारणत: ३५ किलोमिटरचा मार्ग दहा मिटर रुंदीकरण करून केला जात आहे. विशेष म्हणजे महाराष्टÑ-गुजरात राज्याच्या हद्दीलगत असलेला हा रस्ता विसरवाडी-सेंधवा व शेवाळी-नेत्रंग महामार्गाला नंदुरबार बायपास म्हणून उपलब्ध होणार आहे. या रस्त्याच्या कामाला वेग देण्यात आला आहे.नंदुरबार शहरातून दोन महामार्ग आणि एक राज्यमार्ग जाणार आहे. यामुळे शहरातील वाहतुकीचा ताण वाढणार आहे. दोन महामार्गाअंतर्गत नंदुरबार बाहेरून वळण रस्ता करावा अशी मागणी जोर धरू लागली परंतु नवीन जमीन अधीग्रहण करणे आणि ती पुर्ण प्रक्रिया राबविणे, त्यासाठी निधी उपलब्ध करून घेणे या बाबी अडचणीच्या होत्या. त्यामुळे रिंगरोडचा प्रस्ताव बारगळला होता. आता अ‍ॅन्युटी योजनेअंतर्गत ३५ किलोमिटरचा रस्त्याचे रुंदीकरण केले जात आहे.समशेरपूर ते करणखेडाअ‍ॅन्युटी योजनेअंतर्गत होणाºया रस्त्याच्या कामात समशेरपूर ते करणखेडा हा रस्ता तयार केला जात आहे. पूर्वी हा रस्ता होता, परंतु तो जिल्हा मार्ग म्हणून ओळखला जात होता. परंतु दोन राज्यांच्या सिमेवरून जाणारा आणि दोन राष्टÑीय महामार्गांना जोडणारा रस्ता म्हणून त्याकडे पाहिले जात असल्यामुळे त्याचे रुंदीकरण करण्यात येत आहे. आता हा रस्ता थेट दहा मिटरचा होणार आहे. विसरवाडी-सेंधवा महामार्गापासून निधून सुजालपूर, शिंदे, खोडसगाव, आडछी, गुजरभवाली, जांभोली आणि करणखेड्याला हा रस्ता पुन्हा विसरवाडी-सेंधवा महामार्गाला मिळणार आहे.या दरम्यान हा रस्ता शेवाळी-नेत्रंग महामार्ग ओलांडून देखील जाणार आहे. त्यामुळे अंकलेश्वर-बºहाणपूर महामार्गाकडून येणारी वाहने थेट नंदुरबारला न येता करणखेडामार्गे नवापूरकडे किंवा साक्रीकडे जाऊ शकतील. शिवाय जाणारी वाहने देखील तशीच जाणार आहेत. यामुळे नंदुरबारातील सध्या असलेल्या वळण रस्त्यावरील वाहतुकीचा ताण बºयाच प्रमाणात कमी होणार आहे.३५ किलोमिटरचा रस्तासुजालपूरपासून ते करणखेडापर्यंतचा हा रस्ता ३४.८५ किलोमिटरचा आहे. दहा मिटर रुंदीचा हा रस्ता असून ठिकठिकाणी फरशीपूल आणि छोटेपूलही तयार केले जात आहेत. संपुर्ण रस्ता हा गुजरात व महाराष्टÑ सिमेलगतच्या गावांमधून जात आहे. त्यामुळे त्याचा दर्जाही चांगला ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ६० टक्के निधी हा राज्य शासन थेट देणार आहे तर ४० टक्के निधी हा दहा वर्षात टप्प्याटप्प्याने ठेकेदाराला दिला जाणार आहे. नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत हा रस्ता तयार केला जात आहे. ज्या गावातून हा रस्ता जाईल त्या गाव हद्दीत दोन्ही बाजुला गटार व त्यावर स्लॅब टाकण्याची जबाबदारी संबधीत ठेकेदाराची राहणार आहे.या रस्त्यामुळे या भागातील दळणळवण सोपे होऊन या गावांचा विकासाला देखील मदत मिळणार आहे. त्यामुळे या रस्त्यााचे काम लवकर आणि दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत.

अशाच प्रकारचा वळण रस्ता किंवा दहा मिटर रुंदीचा रस्ता हा शेवाळी-नेत्रंग महामार्गापासून निघून दुधाळे, भोणे, वावदमार्गे नंदुरबार-दोंडाईचा रस्त्याला जोडल्यास मोठी सोय होणार आहे. अर्थात शिरपूर, सोनगीर, दोंडाईचाकडून येणारी वाहतूक या मार्गाने वळून पुन्हा महामार्गाला जोडली जाणार आहे. परिणामी नंदुरबारात अशी वाहने येण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. हा रस्ता देखील जिल्हा मार्ग म्हणून सध्या अस्तित्वात आहेच.वावदपासून पुढे उमर्दे व तेथून पातोंडाला हा रस्ता जोडल्यास पुन्हा महामार्गाला जोडला जाणार आहे. एमआयडीसीत येणारी व जाणारी वाहने या रस्त्याने परस्पर जावू शकतील. एमआयडीसीचा देखील विकास होण्यास त्यामुळे मदत होणार आहे. तसे झाल्यास नंदुरबारच्या बाहेरून पुर्ण रिंगरोड अस्तित्वात येऊ शकेल आणि त्यासाठी नवीन जागा अधिग्रहीत करण्याची देखील गरज राहणार नसल्याचे स्पष्ट आहे.