शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांनी मांडला रावलापाणीचा क्रांतीकारी इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 13:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : नर्मदा नवनिर्माण अभियानांतर्गत तालुक्यातील तºहावद पुनर्वसन येथे सुरू असलेल्या जीवन शाळांच्या बालमेळाव्यात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : नर्मदा नवनिर्माण अभियानांतर्गत तालुक्यातील तºहावद पुनर्वसन येथे सुरू असलेल्या जीवन शाळांच्या बालमेळाव्यात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात आदिवासी क्रांतीकारकांच्या स्वातंत्र्य लढ्यावर नाटीका सादर करून रावलापाणीचा लपलेला इतिहास सांगितला. या बालकांचा हा कार्यक्रम पाहून सिनेकलाकारही भारावले होते. दरम्यान, कार्यक्रमाच्या समारोप उद्या रविवारी दुपारी पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.नर्मदा नवनिर्माण अभियानांतर्गत सरदार सरोवर प्रकल्पातील विस्थापितांच्या मुला-मुलींसाठी धडगाव, अक्कलकुवा तालुक्यात साधारण सात जीवन शाळा सुरू आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांचा दरवर्षी बालमेळावा घेतला जातो. यंदा तळोदा तालुक्यातील तºहावद पुनर्वसन येथे गेल्या गुरूवारपासून बालमेळावा सुरू आहे. यात साधारण ८०० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. चार दिवसीय बालमेळाव्यात विविध मैदानी स्पर्धांबरोबरच रात्री सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या या बाल मेळाव्व्यात सिने कलाकार, साहित्यिक सहभागी झाले आहेत. शुक्रवारी रात्री झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थ्यांनी आदिवासी क्रांतीकारक खाज्या नाईक, भिमा नाईक, तंट्या भिल यांच्यावर नाटके सादर केली होती. हे क्रांतीकारक भारतीय स्वातंत्र्यासाठी ब्रिटीशांशी कसे लढले याचे अप्रतिम नाट्य विद्यार्थ्यांनी सादर केले होते.आदिवासी क्रांतीकारकांच्या या लपलेल्या इतिहासाची माहिती विद्यार्थ्यांनी नाटकातून साद केल्याने उपस्थित सिनेकलाकारदेखील भारावले होते. त्याच बरोबर अंधेरनगरी चौपट राजा हे नाटक ही विद्यार्थ्यांनी अप्रतिम उभे हूब सादर केल्यामुळे त्यास चांगलीच दाद मिळाली. हे नाटक बसविण्यासाठी ओरीसा राज्यातून खास शंकर महानंद हे कलाकार धडगावात सात दिवसापासून आले होते. विद्यार्थ्यांनी आदिवासी विवाह नृत्य, प्रसिद्ध पावा नृत्य सादर केले होते.दरम्यान, चार दिवसापासून सुरू असलेल्या या बाल मेळाव्याचा समारोप जिल्ह्याचे पालकमंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी यांच्या उपस्थितीत रविवारी दुपारी करण्यात येणार आहे. कार्यक्रमास शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीदेखील उपस्थित राहणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.