तळोदा येथे कोविड लसीकरणाबाबत आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:30 IST2021-04-25T04:30:28+5:302021-04-25T04:30:28+5:30

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नारायण बावा, तहसीलदार गिरीश वखारे, सहाय्यक ...

Review meeting on covid vaccination at Taloda | तळोदा येथे कोविड लसीकरणाबाबत आढावा बैठक

तळोदा येथे कोविड लसीकरणाबाबत आढावा बैठक

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नारायण बावा, तहसीलदार गिरीश वखारे, सहाय्यक गटविकास अधिकारी रोहिदास सोनवणे, मुख्याधिकारी अनंत जवादवार आदी उपस्थित होते.

यावेळी तालुक्यातील एकूण लसीकरण केंद्रे, केंद्रनिहाय लसीकरणासाठी पात्र व्यक्तींची संख्या आणि मनुष्यबळाचे नियोजन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामस्तरावरील कर्मचाऱ्यांकडून लसीकरणाबाबत येणाऱ्या अडचणी, जनतेचा प्रतिसाद याबाबत माहिती घेण्यात आली.

प्रत्येक लसीकरण केंद्र निहाय आराखडा तयार करण्यात यावा. नगरपालिका क्षेत्रात लसीकरणासाठी वॉर्डनिहाय नियोजन करून त्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी यांनी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, पोलीस पाटील यांनी एकत्रितरित्या गावागावात जाऊन लोकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून द्यावे, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी महेश पाटील यांनी केल्या.

बैठकीस शिक्षण व आरोग्य विभागाचे अधिकारी, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, पर्यवेक्षक तलाठी, मंडळ अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Review meeting on covid vaccination at Taloda