शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडीत यांची अंगणवाडीला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा दौ:यावर आलेल्या आदिवासी आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडीत यांनी पातोंडा ता़ नंदुरबार येथील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा दौ:यावर आलेल्या आदिवासी आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडीत यांनी पातोंडा ता़ नंदुरबार येथील अंगणवाडी क्रमांक एकला भेट दिली होती़ दरम्यान याठिकाणी भोंगळ कारभार पाहून त्यांनी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना केल्या़   सोमवारी सकाळी विवेक पंडीत यांनी पातोंडा येथील अंगणवाडी केंद्रात भेट दिल्यावर या ठिकाणी एकही  तीव्र कुपोषित मुल नसल्याचे  सांगण्यात आले समितीचे अध्यक्ष पंडीत यांना सांगण्यात आले होत़े यावेळी त्यांनी रजिस्टरची तपासणी केली असता, तशी नोंदही आढळून आली़ परंतू  रजिस्टरमधील  नोंदी  आणि मुलांची  अवस्था  पाहून त्यांनी  एका बालकाची  तपासणी केली़ यात बालकाचे वजन  कमी आढळून ते तीव्र कुपोषित असल्याचे सिद्ध झाल़े रजिस्टरमध्ये त्याची नोंद कुपोषित बालक करण्यात आली होती. व त्याला  कुपोषित बालकाची ट्रीटमेंट  दिली जात होती. तसेच अंगणवाडीतील मुलांची पटसंख्या व त्यांना दिला जाणारा आहार व इतर आकडेवारी जशीच्या तशी कॉपी पेस्ट केलेली आढळली.यावेळी विवेक पंडित यांनी अंगणवाडी सेविकेला चुकीची  आकडेवारी लिहिल्याबद्दल  धारेवर धरले. तसेच  बालकविकास प्रकल्प अधिकारी यांना अंगणवाडीचा पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. आढावा समितीच्या नंदुरबार दौ:यात शहरालगतच्या पहिल्याच अंगणवाडीच्या पाहणीत समोर आलेली परिस्थिती बघता  ग्रामीण भागात काय परिस्थिती असेल याबाबत आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडीत यांनी चिंता व्यक्त केली़ अंगणवाडी आणि किचनसाठी जागा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना अंगणवाडीसाठी किचन बांधून देण्याचे आवाहन  केल़े तसेच किचनसाठी पहिला निधीही दिला त्यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत व्यवस्थापन समितीने दोन महिन्यात कीचन बांधून देण्याचे आश्वासन  समिती अध्यक्ष पंडित याना दिले.