शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त जमादार गुन्ह्यांची कागदपत्रे घेवून परागंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत जमादाराने त्यांच्याकडे असलेल्या सहा गुन्ह्यांचा तपास न करता ते कागदपत्र ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत जमादाराने त्यांच्याकडे असलेल्या सहा गुन्ह्यांचा तपास न करता ते कागदपत्र स्वत:कडे ठेवले. सेवानिवृत्तीनंतरही गुन्ह्यांची कागदपत्रे पोलीस ठाण्यात सादर न केल्याने अखेर त्यांच्यावर पोलिसांनीच गुन्हा दाखल केल्याचा प्रकार नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात घडला.  सरदारसिंग रजेसिंग सोनवणे, रा.संभाजीनगर, शहादा असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस जमादाराचे नाव आहे. सरदारसिंग सोनवणे हे डिसेंबर 2018 पासून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात सहायक पोलीस उपनिरिक्षक अर्थात जमादार म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांच्याकडे मारहाण, अपघात, चोरी, अवैध दारू, अगिA उपद्रव यासह इतर दहा दखलपात्र गुन्ह्यांचा तपास होता. परंतु या गुन्ह्यांचा तपास त्यांनी केला नाही. शिवाय वरिष्ठांच्या आदेशाची अवज्ञा केली. याच काळात ते सेवानिवृत्त देखील झाले. परंतु सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी या गुन्ह्यांचे कागदपत्र किंवा तपासासंदर्भातील प्रगती त्यांनी वरिष्ठांकडे सुपदरू केली नाही. निरिक्षक राजेश शिंगटे यांनी कर्मचा:यामार्फत त्यांच्याशी संपर्कही साधला. परंतु उपयोग झाला नाही. त्यामुळे अखेर निरिक्षक राजेश शिंगटे यांनी फिर्याद दाखल केली. त्यावरून सरदारसिंग सोनवणे यांच्या विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला.