शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
5
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
6
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
7
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
8
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
9
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
10
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
11
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
12
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
13
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
14
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
15
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
16
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
17
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
18
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
19
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
20
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्यांना निर्बंध मुक्त केल्याने शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 12:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्री येणारा माल व्यापारी बांधावर जावून किंवा शेतकरी परस्पर बाहेरच ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्री येणारा माल व्यापारी बांधावर जावून किंवा शेतकरी परस्पर बाहेरच व्यापाऱ्यास विक्री करु शकणार आहेत़ केंद्रशासनाने बाजार समित्यांचे निर्बंध उठवले असून याचा फटका शेतकरी आणि व्यापारी या दोघांना सर्वाधिक बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे़
त्या-त्या तालुक्यात असलेल्या बाजार समितीत त्याच तालुक्यात उत्पादित करण्यात आलेला माल घेऊन शेतकरी त्याची विक्री करत होता़ यातून तालुकानिहाय कृषी उत्पन्न बाजार समित्या निर्माण करुन शेतकऱ्यांकडून हमीभावानेच व्यापारी माल खरेदी करतील याकडे लक्ष दिले जात होते़ भाजीपाला, धान्य, कापूस, तेलबिया उत्पादन आणि फळे यांचे व्यवहार वर्षभर बाजार समितीत सुरू होते़ हे व्यवहार बाहेरही झाले तरी बाजार समितीची ‘पट्टी’ व्यापाºयास भरावी लागत होती़ परंतु केंद्र शासनाने बाजार समिती निर्बंध मुक्त केल्याने बोगस व्यापाºयांचा सुळसुळाट होवून शेतकºयांची फसवणूक होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे़ जिल्ह्यात प्रामुख्याने मिरची, केळी आणि पपई या तिन उत्पादनांची बाजारपेठ मोठी आहे़ मिरची खरेदी विक्रीचे व्यवहार आजवर बाजार समितीच्या बाहेर झालेले नाहीत़ या कायद्याच्या अंमलबजावणीत असलेले ओपन मार्केट सिस्टिम शेतकºयांना घातक ठरू शकते असेही मत व्यक्त करण्यात आले़ दरम्यान जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये बाहेरील तालुक्यातून माल खरेदी विक्रीसाठी पूर्वी पासून येत असल्याने त्यातून खूप मोठा फरक पडणार नाही़


४नंदुरबार जिल्ह्यात शहादा, नंदुरबार, नवापूर, तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव येथे बाजार समित्यांची निर्मिती करण्यात आली आहे़ त्यांना जोडून उपबाजार समित्याही आहेत़ या समित्यांच्या अखत्यातरीत त्या-त्या तालुक्यातील शेतकरी बाजारात विक्रीसाठी आणत असलेल्या मालावर लक्ष ठेवण्यात येते़ व्यवहारात अडचणी आल्यास व्यापाऱ्यांना समज देण्याचे कामही केले जाते़ विश्वासावर बºयाच वर्षांपासून हे शेतकरी आणि व्यापारी यांच्यात व्यवहार सुरू आहेत़ शासनाने आणलेल्या ओपन मार्केट पॉलिसीमुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल कुठेही विक्री करता येणार आहे़ या व्यवहारांपोटी स्थानिक बाजार समितीला कर देण्याची गरज नाही़ परंतु दुसरीकडे बाहेरील व्यापाºयांकडून वापरली जाणारी वजन मापे आणि व्यवहार याबाबत योग्य ती माहिती नसल्यास फसवणूक होवू शकते़


केंद्र शासनाने जाहिर केलेल्या धोरणाबाबत आताच काही सांगणे उचित होणार नाही़ दोन वर्षात या निर्णयाचे फायदे तोटे कळतील़ यापूर्वी शेतकरी-व्यापारी यांच्यातील व्यवहारांबाबत मार्केट कमिटी जी सुरक्षा पुरवत होती़ तीन यापुढे देणे अशक्य होताना दिसते़ बाहेर होणाऱ्या व्यवहारासाठीची वजन मापे किंवा परवाने यांची तपासणी होवू शकणार नाही़
-हेमंत चौधरी, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, शहादा़


कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांना प्रत्यक्षपणे सुरक्षा देत होती़ विविध व्यवहारात शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही यासाठी प्रयत्नशील होती़ ओपन पॉलिसीमुळे शेतकरी माल कुठेही माल विक्री करण्यासाठी मुक्त असतील़ यातून त्यांचे नुकसान होणार आहे़
-योगेश अमृतकर, सचिव, बाजार समिती, नंदुरबाऱ


केंद्र शासनाने धोरण काय आहे़ आधी ते अभ्यासावे लागेल़ व्यापारी हे कायम विश्वासार्ह व्यवहार करत आले आहेत़ धान्य आणि मिरचीचे व्यवहार हे कोट्यावधीच्या घरात आहेत़ शेतकरी यापूर्वीही विश्वासाने येथे येत होता़ यानंतरही नंदुरबार बाजार समितीतच येणार आहे़
-किशोर वाणी, अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन नंदुरबाऱ