बाहेरून आलेल्यांची माहिती तात्काळ कळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 12:54 PM2020-04-10T12:54:59+5:302020-04-10T12:55:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यालगतच्या भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने जिल्ह्यात बाहेरून आलेल्या व्यक्तींवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. ...

Report the information of outsiders immediately | बाहेरून आलेल्यांची माहिती तात्काळ कळवा

बाहेरून आलेल्यांची माहिती तात्काळ कळवा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यालगतच्या भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने जिल्ह्यात बाहेरून आलेल्या व्यक्तींवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यामुळे बाहेरून आपल्या गावात, परिसरात आलेल्या सर्व व्यक्तींची माहिती प्रशासनाला द्यावी असे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्ह्यालगतच्या मालेगाव, नाशिक, जळगाव, सेंधवा या शहर व जिल्ह्यांच्या सरहद्दीवर कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले आहेत. या परिसरातून तसेच इतर राज्य व देश येथूनही मोठ्या प्रमाणावर नागरिक जिल्ह्यात आलेले असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ९ एप्रिल रोजीच्या पाच दिवस आधी जे नागरिक जिल्हा, राज्य, देशाबाहेरून नंदुरबार जिल्ह्यात वास्तव्यास आलेले असतील त्यांनी तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे किंवा आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा. त्यांच्या प्रवासाबाबतची सत्य माहिती कळवावी. जेणेकरून प्रशासनास त्यावर उपाययोजना करणे शक्य होईल. प्रशासनापासून माहिती लपविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी गेल्या पाच दिवसात आपल्या भागात कुणी नवीन व्यक्ती वास्तव्यास आली असेल तर तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षातील (०२५६४-२१०११३) या क्रमांकाशी संपर्क साधावा. माहिती देणाºयाचे नाव व इतर माहिती गोपनीय ठेवली जाईल असे आवाहनही पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केले आहे.

Web Title: Report the information of outsiders immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.