लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महिलेला शिवीगाळ करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी खडकी ता़ धडगाव येथील एकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे़ १७ जानेवारी रोजी हा प्रकार घडला होता़खडकी येथील दाम्पत्य ऊसतोडीसाठी गुजरातमध्ये गेले होते़ दरम्यान भिरलाल नरलाल पावरा याने फोन करुन महिलेसोबत अश्लील भाषेत संवाद साधत शिवीगाळ करुन विनयभंग केला होता़ याप्रकरणी पिडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित भिरलाल पावरा याच्याविरोधात म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}