शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
5
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
6
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
7
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
8
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
9
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
10
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
11
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
12
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
13
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
14
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
15
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
16
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
17
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
18
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
19
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
20
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

सुलवाडे, बामखेडा, कळंबूत रुग्ण आढळल्याने उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 12:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी/बामखेडा/कळंबू : शहादा तालुक्यातील सुलवाडे, बामखेडा त.त. व कळंबू येथे कोरोना बाधित प्रत्येकी एक रुग्ण आढळून ...

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी/बामखेडा/कळंबू : शहादा तालुक्यातील सुलवाडे, बामखेडा त.त. व कळंबू येथे कोरोना बाधित प्रत्येकी एक रुग्ण आढळून आल्याने या गावांमध्ये ग्रामपंचायत व आरोग्य विभागातर्फे उपाययोजना करण्यात येत आहेत.
सुलवाडे येथे फवारणी
शहादा तालुक्यातील सुलवाडे येथील ७० वर्षीय वृद्ध महिला धुळे येथे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने सुलवाडे गावात आरोग्य विभागाकडून उपाययोजना सुरू असून संपर्कात आलेल्या चार जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. धुळे येथील एका खाजगी दवाखान्यात महिलेला उपचारासाठी नेण्यात आले होते. तेथे महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल रविवारी सकाळी स्थानिक आरोग्य विभागाला प्राप्त झाला. आरोग्य विभागाचे कम्युनिटी हेल्थ आॅफिसर डॉ.प्रसाद पाटील, औषध निर्माण अधिकारी मधुकर पाटील, आरोग्यसेवक कुवर, सोनिया महेंद्रे व आरोग्य पथकामार्फत उपाययोजना करण्यात येत असून कोरोना पॉझिटीव्ह महिलेच्या कुटुंबातील चार जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. ग्रामपंचायतीतर्फे गावात फवारणी करण्यात आली असून बाहेरून येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवले जात आहे. सरपंच कैलास पवार, उपसरपंच अशोक वाघ, ग्रामसेवक बी.आर. माळी, दिलीप पवार, पोलीस पाटील सचिन पवार आदी गावात लक्ष ठेवून आहेत.
बामखेड्यात पुन्हा रुग्ण
बामखेडा येथील ७७ वर्षीय वृद्धाला नाशिक येथे खाजगी रुग्णालयात मूत्राशयाच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे दाखल होण्याअगोदर कोरोनाची तपासणी केली असता त्यात ते पॉझिटीव्ह आढळून आल्याने गावात खबरदारी घेतली जात आहे. वडाळी येथे एक रुग्ण आढळून आल्याने बामखेडा गाव आधीच बफर झोनमध्ये होते. या रुग्णाच्या संपर्कातील तीन जणांना स्वॅब तपासणीसाठी शहादा येथील केंद्रात पाठविण्यात येणार असून सध्या त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गावात तीन दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. आरोग्य विभागाकडून गावात सर्वे करण्यात येत आहे. ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस पाटील डॉ.योगेश चौधरी, वडाळी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राजन दुग्गड व आरोग्य कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
कळंबूत ११ जण क्वारंटाईन
शहादा तालुक्यातील कळंबू येथे कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रादुर्भाव वाढूनये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासने उपाययोजना हाती घेत बाधित रुग्णांचे घर व परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला आहे. कळंबू येथील एका ७१ वर्षीय पुरुषाचा अहवाल रविवारी पॉझिटीव्ह आल्याने गावात खबरदारीच्या उपाययोजना म्हणून कोरोना रुग्णाच्या संपर्कातील ११ जणांना स्वॅब तपासणीसाठी शहादा येथील विलगीकरण कक्षात पाठवून क्वारंटाईन करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीतर्फे गावात फवारणी करण्यात आली. या वेळी पं.स. सदस्या बानूबाई ईशी, देवेंद्र बोरसे, उपसरपंच वासुदेव बोरसे, ग्रामविकास अधिकारी बी.बी. देसले, सदस्य ललीत बोरसे, सुरेश कुवर, पोलीस पाटील अमरदास पाटील उपस्थित होते. सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सी.एम. पाटील, डॉ.राकेश पाटील, जे.बी. गिरासे, वाल्मिक बांगर, मीनाबाई निकम, आशा सेविका दीपाली देवरे, सुनंदा भील, सपना कुवर, अंगणवाडी सेविका सुनंदा पवार, ग्रामपंचायत कर्मचारी देविदास कुवर, मनोहर बोरसे, निंबा कुवर आदी उपाययोजनेसाठी परिश्रम घेत आहेत.