शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

वीज कंपनीची वसुली माेहीम थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:30 IST

नंदुरबार : जिल्ह्यातील विविध भागांत वीज वितरण कंपनीची वील वसुली मोहीम सध्या थंडावली आहे. लाॅकडाऊनमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये, ...

नंदुरबार : जिल्ह्यातील विविध भागांत वीज वितरण कंपनीची वील वसुली मोहीम सध्या थंडावली आहे. लाॅकडाऊनमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी कंपनीकडून मोहीम थांबविण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, जिल्ह्यात अद्यापही अनेक भागात वीज बिलांबाबत तक्रारी असून, त्या तक्रारी निकाली काढण्याची मागणी होत आहे.

भाजीपाला रस्त्यावर

नंदुरबार : शनिवार आणि रविवारी जनता कर्फ्यू असल्याने शुक्रवारी सकाळी बाजारपेठेत विक्रीसाठी आणलेला भाजीपाला विक्रेत्यांनी अक्षरश: रस्त्यावर फेकून दिल्याचा प्रकार घडला आहे. शनिवारी बाजार सुरू होणार नसल्याने भाजीपाला फेकण्याशिवाय पर्याय नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे होते. दरम्यान, ग्रामीण भागातून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक शून्यावर आली आहे.

मजुरांना रोजगार

नंदुरबार : शहरातील विविध भागात बांधकामे सुरू असल्याने मजुरांना रोजगार मिळत आहे. लाॅकडाऊन काळातही ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार मिळत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. नंदुरबार तालुक्याच्या विविध भागातून मजूर शहर आणि परिसरात मजुरीसाठी येतात. कोविड नियमांचे पालन करीत मास्कचा वापर करीत त्यांच्याकडून कामे करण्यात येत असल्याचे चित्र दिसून आले आहे.

ग्रामीण भागात रुग्णवाढीने वाढल्या चिंता

नंदुरबार : तालुक्याच्या पूर्व भागातील गावांत कोरोनाबाधितांची संख्या समोर येत आहे. यातून चिंता व्यक्त करण्यात येत असून, आरोग्य विभागाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीपर शिबिरे घेऊन नागरिकांना मास्कचा वापर वाढविण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

पाणी व्यवसाय तेजीत

नंदुरबार : उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पाणी विक्रीचा व्यवसायही तेजीत आला आहे. यात पॅकेज वाॅटरसह शुद्ध पाणीपुरवठा करणे वाढले आहे. यातून त्या-त्या व्यावसायिकांना लाभ होत आहे. जिल्ह्याच्या दुर्गम भागापर्यंत पाणी विक्रीचा व्यवसाय फोफावला असून, यातून मोठी उलाढाल होते.

कोळदे येथील खडीमुळे समस्या

नंदुरबार : तालुक्यातील कोळदे गावापासून विसरवाडी ते सेंधवा महामार्ग सुरू होतो. दरम्यान, नंदुरबारकडून येणारी वाहने महामार्गावर यावीत यासाठी खोंडामळी फाट्यावर खडीचा चढावा करण्यात आला आहे. हा चढाव वाहनधारकांसाठी धोकेदायक ठरत असून, याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी आहे. खडीत वाहन घसरून दुचाकीस्वारांचे अपघात होत असल्याने येथे भराव करण्याची मागणी आहे.

सांडपाणी रस्त्यावर

नंदुरबार : शहरातील तांबोळी गल्ली परिसरातील ड्रेनेजमधून सांडपाणी बाहेर येत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे पाणी थेट तूप बाजारापर्यंत येत आहे. या मार्गावर बँका असल्याने त्या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांची गैरसोय होत असल्याचे दिसून आले आहे.

समस्या कायम

नंदुरबार : शहरातील कोरीट नाक्यावर मातीचा ढीग रस्त्याच्या मधोमध असल्याने नागरिकांना अडचणीचे ठरत आहे. गिरीविहारकडून भरधाव येणा-यांना मातीचा ढीग व पुढील खड्डा दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. या ठिकाणी रस्ता समतल करण्याची मागणी आहे.

तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित

नंदुरबार : तालुक्यातील काकर्दे शिवारातील वीजपुरवठा गेले तीन दिवसांपासून खंडित झाला आहे. वादळी वाऱ्यांमुळे खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी वीज वितरण कंपनीकडून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. परंतु, त्यास अद्याप यश आलेले नसल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, वीजपुरवठा नसल्याने गावाची पाणी योजना पूर्णपणे बंद पडली असून, नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात आले आहे.

पोलीस बंदोबस्त

नंदुरबार : तालुक्यातील कोरीट गावाजवळील सावळदा फाट्यावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या ठिकाणी पोलिसांकडून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला जात आहे.