शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शहादा महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा : ग्रंथ परिचय’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:32 IST

सातपुड्याच्या पायथ्याशी आदिवासी परिसरात किसान, मजूर, दलित, ग्रामीण युवक-युवतींचा उत्कर्ष व्हावा या ध्येयाने स्व.पी.के. अण्णा पाटील यांनी १९७० साली ...

सातपुड्याच्या पायथ्याशी आदिवासी परिसरात किसान, मजूर, दलित, ग्रामीण युवक-युवतींचा उत्कर्ष व्हावा या ध्येयाने स्व.पी.के. अण्णा पाटील यांनी १९७० साली म्हणजे ५० वर्षांपूर्वी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाची स्थापना केली. महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ‘वाचन प्रेरणा : ग्रंथ परिचय’ उपक्रम राबिवण्यात आला. या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील प्रत्येक प्राध्यापकाने ग्रंथालयातून एक पुस्तक वाचनास घ्यावे व त्या पुस्तकाचा अभ्यास करून त्यावर परिचयात्मक, समीक्षात्मक वक्तव्य द्यावे. अशा स्वरूपाचा हा उपक्रम सलग एक महिना दररोज दोन तास याप्रमाणे राबविण्यात आला. कादंबरी, नाटक, आत्मचरित्र, कथासंग्रह, काव्यसंग्रह अशा विविध प्रकारांचे ग्रंथ वाचन करून त्यांचा परिचय प्राध्यापकांनी सादर केला. या सादरीकरणाचे ग्रंथ रूपात प्रकाशन संस्थेच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे, अशी माहिती प्राध्यापक प्रबोधिनीचे संयोजक डॉ.विजयप्रकाश शर्मा यांनी दिली.

पूर्ण महिनाभर झालेल्या या उपक्रमात समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील, प्राचार्य डॉ.आर.एस. पाटील, उपप्राचार्य डॉ.एम.के. पटेल व डॉ.एस.डी. सिंदखेडकर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य इंदिरा पटेल, पर्यवेक्षक प्रा. कल्पना पटेल, मंडळाच्या सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापकांनी उपस्थिती दिली. प्राध्यापक प्रबोधिनीचे संयोजक डॉ. विजयप्रकाश शर्मा, सचिव प्रा.वजीह अशहर, प्रा.एस.एस. पवार, प्रा.मधुकर ठाकरे, प्रा.मनोज चौधरी यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले. कोरोना काळात विधायक शैक्षणिक व सांस्कृतिक उपयोग करीत शासनाचे सर्व नियम पाळून राबविलेल्या या उपक्रमाबद्दल कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.पी. पाटील, प्र-कुलगुरू पी.पी. माहुलीकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डी.आर. पाटील, मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, मानद सचिव कमलताई पाटील, समन्वयक पी.आर. पाटील यांनी कौतुक केले.