शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिकांनी वाचला समस्यांचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 13:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : दुर्गम भागातील विविध समस्या आणि प्रश्नांबाबत राज्यपालांना यावेळी अनेकांनी अवगत केले. यासंदर्भात शासन पातळीवर ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : दुर्गम भागातील विविध समस्या आणि प्रश्नांबाबत राज्यपालांना यावेळी अनेकांनी अवगत केले. यासंदर्भात शासन पातळीवर योग्य तो पाठपुरावा करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा अशा सुचना त्यांनी यावेळी दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी आदिवासी भाषेतून केले. खासदार डॉ.हिना गावीत यांनी केंद्राच्या योजनांची माहिती दिली. भगदरी संस्थानचे भगतसिंग पाडवी, माजी आमदार डॉ. नरेंद्र पाडवी यांनी सपत्नीक भगदरी चे संस्थानिक राजे यांची प्रतिमा भेट दिली.रामसिंग वळवी यांनी आरोग्य, शिक्षण, विज, रस्ते, या मुलभुत सुविधांचा आजही वानवा असुन त्या सोडवुन मोलगी या गावाला तालुक्याचा दर्जा मिळावा अशी मागणी करण्यात आली. अक्कलकुवा तालुक्यातील ७३ वन गावांचा प्रश्न त्वरीत मार्गी लावावा. नंदुरबार हा आदिवासी बहुल लोकसंख्येचा जिल्हा असल्याने जिल्ह्याला आदिवासी जिल्ह्याचा दर्जा द्यावा. अनेक गावे व पाड्यांपर्यंत रस्ते नसल्याने तेथे दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्या आदी मागण्या त्यांनी यावेळी केल्या.विजेचा विषय निघताच नागरिकांनी समस्यांचा पाडा वाचला.डॉ.नरेंद्र पाडवी यांनी भगदरी दत्तक घेतल्यानंतर गावाचा विकास झाला. अधिकारी वर्ग राज्यपालांचा दौऱ्याच्या वेळीच कामाला लागतात. मात्र कृती आराखडाप्रमाणे शासकिय यंत्रणा कांमे करण्यात दिरंगाई करत असल्याबाबत खंत व्यक्त केली. गेल्या पाच वर्षात झालेल्या विकास कामांचा निधी व झालेली कामे यांचे मुल्यांकन व्हावे तरच सत्य समोर येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.सरपंच प्रमिला वसावे यांनी विज, रस्ते, व स्थलांतर थांबविण्यासाठी रोजगार निर्मिती करीता प्रोत्साहन देणे गरजेचे असुन या भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.रामसिंग वळवी यांनी समस्यांचा पाढा वाचला. या समस्या सोडविण्यासाठी शासनाने या भागात महुफुल उद्योग प्रकल्प, आमसुल उद्योग प्रकल्प, भगर उद्योग प्रकल्प, बांबू उद्योग प्रकल्प राबवून या प्रकल्पांना चालना देण्याची मागणी केली. यामुळे नागरिकांना रोजगार उपलब्ध होऊन स्थलांतर रोखता येईल व मानव विकासाचा आलेख उंचावेल असेही त्यांनी सांगितले.