शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

११ महिन्यांनी सुरु झाली महाविद्यालये तुरळक हजेरी ; आवारामध्ये शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 11:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुळे मार्च २०२० पासून बंद असलेली महाविद्यालये ११ महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर सोमवारी सुरू करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनामुळे मार्च २०२० पासून बंद असलेली महाविद्यालये ११ महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर सोमवारी सुरू करण्यात आली. परंतु विद्यापीठाने स्वीकारलेले ५० टक्के क्षमतेचे धोरण आणि बंद असलेली वसतिगृहे यामुळे पहिल्या दिवशी महाविद्यालयांमध्ये तुरळक अशी विद्यार्थी संख्या दिसून आली. नंदूरबार जिल्ह्यात कवयित्री बहिणाबाई चाैधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या अखत्यारितील एकूण ४३ महाविद्यालये आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान सोबत शिक्षणशास्त्र, औषध निर्माणशास्त्र यासह विविध विद्याशाखांचे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण देणारी ही महाविद्यालये २२ मार्चच्या जनता कर्फ्यूनंतर बंद करण्यात आली होती. २२ मार्च २०२० नंतर महाविद्यालयांच्या परीक्षा ह्या ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने घेत ऑनलाईन निकाल लावण्यात आले होते. यंदाच्या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया ही १०० टक्के ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली होती. यामुळे विद्यार्थी ११ महिन्यांपासून महाविद्यालयांपासून दुरावले होते. यामुळे दरदिवशी गजबजणारी महाविद्यालये अक्षरश भकास झाली होती. दरम्यान गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड यांनी महाविद्यालये सुरू करण्यास मान्यता दिली होती. विविध उपाययोजनांचा आधार घेत महाविद्यालयांमध्ये शिक्षण सुरू करण्याचे आदेश त्यांनी काढले होते. दरम्यान, विद्यापीठानेही दर दिवशी प्रवेश क्षमतेच्या ५० टक्के विद्यार्थ्यांना आलटून-पालटून बोलावण्याचे महाविद्यालयांना सूचित केले होते. यामुळे सोमवारी पहिल्या दिवशी महाविद्यालये गजबजतील असा अंदाज होता. परंतु पहिल्या दिवशी नंदुरबार शहारातील चार प्रमुख तर जिल्ह्यातील विविध ३९ महाविद्यालयांमध्ये तुरळक संख्येने विद्यार्थी आले होते. येत्या काळात एसटी बस पासेस तसेच वसतीगृहे सुरु झाल्यानंतर विद्यार्थी संख्या वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. महाविद्यालयात ७० टक्के विद्यार्थी बाहेरुन येतात. 

१८ हजार विद्यार्थी n नंदुरबार जिल्ह्यातील सर्व ४३ महाविद्यालयात एकूण १८ हजार ३५० विद्यार्थी यंदा विविध शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशित झाले आहेत. हे सर्व विद्यार्थी येणार नसले तरी निम्मे विद्यार्थी येण्याची शक्यता होती. यामुळे महाविद्यालयांकडून प्रवेशद्वारावर मास्क, सॅनेटायझर्स आणि थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था करण्यात आली होती. येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची तपासणी करून आत सोडण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. ताप किंवा इतर तत्सम लक्षणे असलेले विद्यार्थी आढळून आले नसल्याची माहिती देण्यात आली आहे. महाविद्यालये सुरू झाल्यानंतर विविध विद्यार्थी संघटनांकडून महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागतही करण्यात आले.