शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
8
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
9
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
10
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
11
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
12
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
13
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
14
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
15
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
17
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
18
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
19
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
20
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
Daily Top 2Weekly Top 5

‘रॅपिड अँटीजेन’ ठरली आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 13:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : देशभरात कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या वेगाने वाढते आहे़ यावर उपाय म्हणून तातडीच्या चाचण्या करुन ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : देशभरात कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या वेगाने वाढते आहे़ यावर उपाय म्हणून तातडीच्या चाचण्या करुन संसर्ग आहे किंवा कसे हे पडताळणीसाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट वापरण्यात येत आहेत़ या टेस्टबद्दल बऱ्याच ठिकाणी शंका उपस्थित होत असल्या तरी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात मात्र रॅपिड अँटीजेन टेस्टने केलेली पडताळणी १०० टक्के खरी ठरली असल्याचे समोर आले आहे़
रॅपिड अँटीजेनमध्ये एकदा दिलेल निकाल दुसऱ्यांदा उलटत नसल्याचे आतापर्यंत करण्यात आलेल्या टेस्टमध्ये समोर आले आहे़ याबाबत ‘लोकमत’ने सत्यता पडताळणी केली असता, रॅपिड अँटीजेनटेस्ट आतापर्यंत जिल्ह्यातील रुग्णांसाठी फायदेशीर ठरली असल्याचे समोर आले आहे़ यातून तात्काळ निकाल मिळाल्याने गंभीर रुग्णांना तातडीने बेड उपलब्ध करुन देत त्यांना व्हेंटीलेटर देण्यासह साधी लक्षणे असलेल्या बाधितांना कोविड कक्षांमध्ये दाखल करण्यात येणाºया अडचणी कमी झाल्या आहेत़ १४ जुलै रोजी आयसीएमआरने परवानगी दिल्यानंतर नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात ट्रूनेट आणि रॅपिड अँटीजेन या दोन चाचण्या सुरू करण्यात आल्या होत्या़ १५ आॅगस्टपासून आरटीपीसीआर लॅबही सुरू झाली आहे़ परंतु यापूर्वी वापरात असलेली रॅपिड अँटीजेन आणि ट्रूनेट या दोन्ही चाचण्या आजवर कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची चाचणी करुन निकाल देण्यास सक्षम ठरल्या आहेत़ तिन्ही चाचण्या नंदुरबार येथे सुरू झाल्याने धुळे येथून स्वॅब तपासणी होवून अहवाल येण्याची प्रतिक्षा आता बंद झाली आहे़
रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या किंवा क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्या रॅग्णाचा रॅपिड अँटीजेन टेस्टचा अहवाल हा काही वेळात आल्यानंतर त्यानुसार उपचार दिला जात आहे़ दरम्यान अँटीजेन टेस्ट नेगेटिव्ह असतानाही एखाद्यात कोरोनाची लक्षणे असल्यास त्याची ट्रूनेट आणि आरटी पीसीआर टेस्ट केली जात आहे़ जिल्ह्यात करण्यात आलेल्या अँटीजेन टेस्टच्या एकूण अहवालांमध्ये बदल प्रमाण हे नगण्य आहे़
दरम्यान आरटी-पीसीआर टेस्ट सुरू झाल्याने प्रशासनाचा ताणही कमी झाली आहे़ आधी अँटीजेन टेस्ट केली जात असल्याने दर दिवशी रुग्ण समोर येत असल्याचे दिसून येत आहे़ यातून गंभीर अशा रुग्णाचा रिपोर्ट तात्काळ समोर आल्यानंतर उपचारांना दिशा मिळत आहे़

४जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये आजअखेरीस ५१२ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत़ यातून ११३ टेस्ट पॉझिटिव्ह आल्या होत्या़ तर ३९९ जणांचे रिपोर्ट हे नेगेटिव्ह आले आहेत़
४दुसरीकडे ट्रूनेट मशिनवर २४१ स्वॅब तपासण्यात आले आहेत़ यातील ६६ स्वॅॅब कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत़
४१५ आॅगस्टपूर्वी अँटीजेन किंवा ट्रूनेट मशिनमध्ये पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह स्वॅबची पडताळणी करण्यासाठी धुळे येथील आरटीपीसीआर मशिनमध्ये होत होती़ परंतु आता ही लॅब नंदुरबार येथेही सुरू झाली असल्याने हा ताण कमी झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे़
४गेल्या महिन्यात २७ जुलै ते १८ आॅॅगस्टदरम्यान करण्यात आलेल्या रॅपिड अँटीजेन टेस्ट ह्या १०० टक्के यशस्वी ठरल्या आहेत़ पॉझिटिव्ह असल्यास इतर दोन्ही मशिनवरही स्वॅब रिपोर्ट हा पॉझिटिव्ह येत आहे़ तर निगेटिव्ह असल्यास त्याचीही पडताळणी सत्य होत आहे़
४रॅपिड अँटीजेन हे चाचणी करण्यात प्रभावी ठरल्याने जिल्हा रुग्णालयात ८०० कीट मागवण्यात आल्या आहेत़ यातून तातडीने चाचण्या करण्याचे काम सुरु आह़े़ एखाद्या रुग्णाची स्थिती ही गंभीर असल्यास अँटीजेनद्वारे पडताळणी करुन उपचार करता येतात़ त्याला कोरोना नसल्यास इतर आजारांवरच्या इलाजांचे मार्गदर्शन केले जाते़
४जिल्ह्यात आरटी पीसीआर ही टेस्ट नव्याने सुरू करण्यात आली आहे़ या लॅबमध्ये मंगळवारी २२ जणांच्या चाचण्या करण्यात येत होत्या़
४आरटी पीसीआर लॅबमध्ये जाणारे कर्मचारी हे पूर्णपणे पीपीई कीटमध्ये दिसून आले़ तर दुसरीकडे रॅपिड अँटीजेन टेस्ट अगदी साध्या पद्धतीने करण्यात येऊन निकालही लागलीच सांगण्यात आला़ रॅपिड टेस्ट करणारे कर्मचारी मास्क, हँडग्लोव्हज यासह इतर साहित्याचा वापर करतात़

रॅपिड अँटीजेनमध्ये पॉझिंिटव्ह आलेला अहवाल ट्रूनेट आणि आता आरटी-पीसीआर या दोन्ही ठिकाणी कायम रहात आहे़ १०० टक्के अहवाल हे खात्रीशीर आले आहेत़ आपल्याकडे चाचणीच्या तीन पद्धतींमुळे अडचणी कमी झाल्या आहेत़
-डॉ़ के़डी़सातपुते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, नंदुरबाऱ