रेल्वे स्थानकाला मिळणार नवीन लूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 11:43 AM2019-09-19T11:43:01+5:302019-09-19T11:43:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अखेर नंदुरबारच्या मॉडेल रेल्वे स्थानक इमारतीच्या बांधकामाला सुरूवात झाली. ब्रिटीशकालीन इमारतीचे स्ट्रर तसेच ठेवून ...

Railway station to get new look | रेल्वे स्थानकाला मिळणार नवीन लूक

रेल्वे स्थानकाला मिळणार नवीन लूक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अखेर नंदुरबारच्या मॉडेल रेल्वे स्थानक इमारतीच्या बांधकामाला सुरूवात झाली. ब्रिटीशकालीन इमारतीचे स्ट्रर तसेच ठेवून ही इमारत बांधली जाणार आहे. त्यासाठी रेल्वेने सहा कोटी 50 लाख रुपये मंजुर केले आहे.  उधना-जळगाव या ताप्ती सेक्शनवरील रेल्वे लाईनवर नंदुरबार रेल्वे स्थानकाचीच इमारत ही या पद्धतीची परंतु आधुनिक स्वरूपात राहणार आहे.   
पश्चिम रेल्वेच्या उधना-जळगाव रेल्वे मार्गाचे नुकतेच दुहेरीकरण पुर्ण करण्यात आले. या दुहेरीकरणाअंतर्गत जवळपास सर्वच लहान, मोठय़ा रेल्वे स्थानकांची नवीन इमारत बांधण्यात आली. नंदुरबार रेल्वे स्थानकाची इमारत देखील त्याचअंतर्गत बांधली जाणार होती. परंतु ब्रिटीशकालीन इमारतीचा लूक कायम ठेवत इमारत बांधली जावी अशी अपेक्षा खासदार डॉ.हिना गावीत यांनी रेल्वे मंत्रालयाकडे व्यक्त केली होती. त्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे त्यांनी पाठपुरावाही केला होता. दुहेरीकरणाचे काम पुर्ण झाल्यानंतर आता नंदुरबारच्या रेल्वे स्थानकाच्या इमारतीचे बांधकाम होते किंवा नाही याबाबत शंका उपस्थित केली जात होती. 
नवीन इमारत मंजुर
नंदुरबार रेल्वे स्थानकाची नवीन इमारत रेल्वे विभागाने मंजुर केली आहे. सध्या असलेल्या ब्रिटीशकालीन इमारतीचा लूक व एकुणच स्ट्रर कायम ठेवत ही इमारत उभी राहणार आहे. त्यामुळे तिला हेरीेटेज लूक मिळणार आहे. या इमारतीत सर्व आधुनिक सुविधा राहणार आहेत. कंट्रोल केबीन, स्टेशन प्रमुख कॅबीन, तिकीट खिडकी, साधे व व्हीआयपी प्रतिक्षालय यासह इतर बाबींचा समावेश राहणार आहे. बाहेरील बाजुस पार्कीग व्यवस्था, प्रवाशांना बसण्यासाठीची सुविधा, हिरवळ यांचा समावेश आहे. या इमारत बांधकामासाठी रेल्वे मंत्रालयाने सहा कोटी 50 लाख रुपये मंजुर केले आहेत. इमारत बांधकामास सुरुवात देखील करण्यात आली आहे.
एकमेव इमारत राहणार
पश्चिम रेल्वेच्या ताप्ती सेक्शनवर अशा प्रकारची अर्थात ब्रिटीशकालीन बांधकामाचे स्ट्रर असलेली ही एकमेव इमारत राहणार आहे. त्यामुळे ही इमारत लक्ष वेधून घेणार आहे. दुहेरीकरणाअंतर्गत या सेक्शनवरील सर्व जुन्या इमारती पाडून एकाच प्रकारची आणि साचेबद्ध स्वरूपाच्या इमारती सर्वच रेल्वे स्थानकांवर बांधण्यात आलेल्या आहेत. परिणामी नंदुरबारच्या इमारतीला हेरीटेज लूक मिळण्याची अपेक्षा आहे.
दहा वर्षापूर्वी मॉडेलचा दर्जा
नंदुरबार रेल्वे स्थानकाला दहा वर्षापूर्वी मॉडेल स्थानकाचा दर्जा देण्यात आला आहे. परंतु मॉडेल स्थानकासारखे एकही काम या ठिकाणी होत नव्हते. दुहेरीकरणाअंतर्गत काही कामे झाली. शिवाय गेल्या पाच वर्षात ब:याच अत्याधुनिक सुविधा आणि सेवा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जावू लागल्या. परंतु इतर मॉडेल स्थानकाच्या तुलनेत त्या तोकडय़ाच ठरल्या. 
फ्लॅटफॉर्म क्रमांक दोन व तीनवर आवश्यक व पुरेसे शेड नाही. प्रवाशांना बसण्यास पुरेसे बाके नाहीत. स्वच्छतेसंदर्भात तर नेहमीच्याच तक्रारी आहेत. याशिवाय रेल्वे स्थानकात रात्रीच्या वेळी रिकामे व गुंड प्रवृत्तीचे टोळके फिरणारेही कायम आहेत. याकडेही रेल्वे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक     आहे.  


रेल्वे स्थानकात नवीन इमारतीसोबतच इतरही विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत. 
या ठिकाणी सर्व प्रकारच्या रेल्वेंना पाणी भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी अत्याधुनिक सयंत्र बसविले जाणार आहे.
बायोटॉयलेटचीही सुविधा येथे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे स्थानक व परिसरात होणा:या घाणीचे व दरुगधीचे प्रमाण कमी होणार आहे. 
नवीन पादचारी पुलाचीही मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. रेल्वे पोलीस ठाणे अर्थात उड्डाणपुलाच्या बाजुला पादचारी पूल झाल्यास शहरवासीयांची मोठी सोय होणार आहे. तो देखील मंजुर झाल आहे.
मोठा डिस्प्ले बसविण्यात येणार आहे. त्यात रेल्वेसंदर्भातील विविध माहिती आणि सुचना दिल्या जाणार आहेत. 
पे व पार्क सुविधा राहणार आहे.
 

Web Title: Railway station to get new look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.