शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

होराफळी येथे अवैध दारू कारखान्यावर धाड, साडेपाच लाखांचा मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : होराफळी, ता.अक्कलकुवा येथे अवैध दारू कारखान्यावर धाड टाकून एलसीबीने पाच लाख ५३ हजार ३०० ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : होराफळी, ता.अक्कलकुवा येथे अवैध दारू कारखान्यावर धाड टाकून एलसीबीने पाच लाख ५३ हजार ३०० रुपयांचे अवैध दारू व इतर साहित्य जप्त केले. याप्रकरणी गुजरातमधील एकाविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनिषभाई छगनभाई वसावा, रा.वडफलीय, ता.डेडीयापाडा, जि.नर्मदा (गुजरात) असे संशयीताचे नाव असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एलसीबीचे निरिक्षक विजयसिंग राजपूत यांना होराफळी येथे अवैध दारू बनविण्याचा कारखाना असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सुचना     दिल्या. होराफळी येथील एका झोपडीत हा कारखाना सुरू   असल्याचे समजल्यावर पथकाने त्या ठिकाणी गोपनियरित्या जाऊन   माहिती काढली. त्यानंतर अक्कलकुवा येथून दोन खाजगी पंचांना घेत पथकाने  थेट त्या ठिकाणी जाऊन कारवाई केली. या झोपडीमध्ये गोवा व्हिस्कीचे   ७३ पुठ्ठ्याचे बॅाक्स, १८० मि.ली. मापाच्या ५० प्लॅस्टिकच्या बाटल्या व इतर बाटल्या असे एकुण चार हजार ३० बाटल्या व त्यामधील व्हीस्की त्यांची किंमत पाच लाख २३   हजार ९०० रुपये. याशिवाय रॅायल व्हिस्की नावाचे पाच खोके व  त्यातील २८० बाटल्या त्यांची किंमती २९ हजार ४०० रुपये असा एकुण     पाच लाख ५३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला  आहे. याबाबत पोलीस नाईक मनोज सुदान नाईक यांनी फिर्याद दिल्याने मनिषभाई वसावा याच्याविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एलसीबीचे निरिक्षक विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मुकेश तावडे, बापू बागूल, विशाल नागरे, सतिष घुले यांनी केली. या कारवाईमुळे या भागात खळबळ उडाली आहे.