खेडदिगर येथे जुगार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:30 IST2021-04-24T04:30:37+5:302021-04-24T04:30:37+5:30

या प्रकरणी पंकज आनंदा चौधरी (वय ३५), हिरालाल हारचंद शिरसाठ (५२, दोन्ही रा. खेडदिगर), संजू भिसन चौधरी (५०, रा. ...

Raid on gambling den at Kheddigar | खेडदिगर येथे जुगार अड्ड्यावर छापा

खेडदिगर येथे जुगार अड्ड्यावर छापा

या प्रकरणी पंकज आनंदा चौधरी (वय ३५), हिरालाल हारचंद शिरसाठ (५२, दोन्ही रा. खेडदिगर), संजू भिसन चौधरी (५०, रा. खेतीया, ता. पानसेमल, जि. बडवानी- म. प्र.), टाल्या कालुसिंग पाडवी (४४, रा. बिलाडी, ता. शहादा) यांना अटक करण्यात आली.

कोरोनाकाळात समूहाने एकत्र येण्यास बंदी असताना तिचे उल्लंघन करून खेडदिगर येथे हनुमान मंदिरामागे एका पडक्या घराच्या आडोशाला झंन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांना मिळाली. यांनी तत्काळ पथक पाठवून गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास छापा टाकून ही कारवाई केली. यात चार हजार रोख रकमेसह आरोपींना अटक केली. म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील बिरारे, जितेंद्र चव्हाण, अजित गावित, सिद्धार्थ सुरवाडे, सचिन वसावे, फुलसिंग पाडवी यांनी ही कारवाई केली.

Web Title: Raid on gambling den at Kheddigar