शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्तीच्या याद्या तातडीने तयार कराव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी पात्र लाभार्थी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यास प्राधान्य द्यावे. राज्यात सर्वप्रथम नंदुरबारच्या शेतकºयांना योजनेचा लाभ मिळेल यादृष्टीने प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आपले सरकार सेवा केंद्र चालकांच्या प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा उपनिबंधक अशोक चाळक, सहाय्यक निबंधक निरज चौधरी, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक जयेश खैरनार उपस्थित होते. डॉ. भारुड म्हणाले, कर्जमुक्ती योजनेची माहिती शेतकºयांना देण्यासाठी योजनेची माहिती असलेले मोठ-मोठे बॅनर्स तयार करुन शासकीय कार्यालय तसेच वर्दळीच्या ठिकाणी लावावे. सर्व सेवा केंद्रावरील बायोमॅट्रीक मशिन, संगणक यंत्रणा सुरळीत असाव्यात. योजनेविषयी माहिती भरतांना येणाºया अडचणी समन्वयाने सोडविण्यासाठी संबंधित यंत्रणांचे तालुकानिहाय व्हॉट्सअ्प ग्रृप तयार करावेत. आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी त्यांना उपलब्ध करुन दिलेल्या प्रशिक्षण साहित्याचा अभ्यास करुन माहिती भरावी.केंद्र चालकांना संगणक प्रणालीमध्ये लॉगिन सुविधा दिली जाणार असून आधार प्रमाणिकरण झालेल्या याद्या पोर्टलवरुन डाऊनलोड करुन छपाई करुन गावांमध्ये प्रसिद्ध कराव्यात. सेवा केंद्रावर आलेल्या शेतकºयास प्रक्रियेबाबत माहिती द्यावी आणि आधार क्रमांक, विशिष्ट क्रमांक, सहमत किंवा असहमत असणे या बाबी समजून सांगाव्यात अशा सूचना त्यांनी दिल्या. चाळक यांनी आधारलिंक, नवीन आधार व आधार प्रमाणिकरणाबाबत माहिती दिली. खैरनार यांनी संगणक प्रणालीबाबत माहिती दिली. या प्रशिक्षण कार्यशाळेस जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र चालक उपस्थित होते.

 

शेतकरी कर्ज योजनेची पुरेशी माहिती संबधितांकडून दिली जात नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांच्या आहेत. त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. लाभ मिळतो की नाही, मिळालाच तर त्यासाठी काय प्रक्रिया करावी लागेल यासह विविध प्रश्न आणि समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. त्यामुळे स्थानिक स्तरावर याबाबत जनजागृती करण्याची मागणी होत आहे.