कुकरमुंडा फाटय़ाजवळ ओव्हरलोड वाहनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 12:01 PM2017-11-07T12:01:24+5:302017-11-07T12:01:29+5:30

संपूर्ण दिवसभर वाहतुकीचा झाला खोळंबा

The question of overloaded vehicles near the Kukarmunda fort is again on the anagram | कुकरमुंडा फाटय़ाजवळ ओव्हरलोड वाहनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

कुकरमुंडा फाटय़ाजवळ ओव्हरलोड वाहनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : अंकलेश्वर-ब:हाणपूर राज्य मार्गावरील कुकरमुंडा फाटय़ाजवळ ेसोयाबीनची पोते भरलेला दहा चाकी ओव्हरलोड ट्रक  पलटला. त्यामुळे या मार्गावरील ओव्हरलोड वाहनांच्या वाहतुकीची समस्या पुन्हा ऐरणीवर आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ट्रक क्ऱ एमएच 18 डी 3144 हा वाशिम येथून गुजरातमधील गांधीधाम येथे सोयाबिन घेऊन जात होता. सोमवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास  कुकरमुंडा फाटय़ाजवळ क्षमतेपेक्षा अधिक सोयाबिनचा माल यात असल्याने हा ट्रक उलटला. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही. परंतु या मार्गावरील ओव्हरलोडेड वाहतुकीची समस्या मात्र यातून जाणवू लागली आह़े या अपघातानंतर ट्रक चालक व सहचालक हे समोरील काच फोडून गाडीच्या बाहेर निघाले.
ट्रक उलटल्यामुळे ट्रक मध्ये असणारी सोयाबीनची पोती रस्त्याच्या कडेला पसरली. ट्रक पलटल्यामुळे राज्यमार्गावरील वाहतुकीला सोमवारी मोठय़ा प्रमाणात अडथळे निर्माण झाले होत़े सोमवारी सकाळपासून रस्त्याच्या कडेलगत फेकले गेलेले सोयाबीनचे पोते पर्यायी वाहनांमध्ये मध्ये भरण्यात येत होत़े तसेच पलटलेला ट्रकदेखील रस्त्यावरून हटविण्याचे प्रय} करण्यात येत होते.त्यामुळे सोमवारी घटनास्थळी मोठय़ा प्रमाणात वाहतुककोंडी निर्माण झाली होती. पोलीस कर्मचा:यांनी सोमवारपासून घटनास्थळी हजर राहून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रय} केला.
या अपघाताबाबत चालकाशी संपर्क केला असता त्याने सांगितले की, समोरून येणा:या भरधाव वाहनाने कट मारला. त्यामुळे ट्रक वेगात असताना रस्त्याच्या खाली उतरला. रस्त्यावरील खड्डे व साईडपट्टयांमुळे ट्रक वरील नियंत्रण सुटले व ट्रक पलटला. असे असले तरी हा ट्रक पलटी होण्यामागे ट्रक ओव्हरलोड भरलेला असणे देखील महत्वाचे कारण होते.अंकलेश्वर-ब:हाणपुर राज्य मार्गावर ओव्हरलोड वाहतुकीमुळे वाहने पलटी होण्याचे प्रकार सातत्याने घडून येत असतात. वर्षभर राज्यमार्गावर क्षमता व मर्यादेपेक्षा अधिक सामग्री भरून धावत असतात. तरी संबधित विभागाकडून त्यांच्यावर कोणत्याच प्रकारची ठोस कारवाई होतांना दिसून येत नाही. दोन-चार वाहनांवर नावापुरती कारवाई करून इतर बेशिस्त वाहनांना अभय दिले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. राज्य मार्गावरील ही ओव्हरलोड वाहतूक जीवघेणी ठरत असून संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
 

Web Title: The question of overloaded vehicles near the Kukarmunda fort is again on the anagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.