नंदुरबारमध्ये निषेध मोर्चाला हिंसक वळण, जमावाकडून काही वाहनांची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 15:31 IST2025-09-24T15:30:31+5:302025-09-24T15:31:14+5:30

Nandurbar News: नंदुरबार येथील युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चाला जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचल्यावर आत जाऊ देन्याच्या मागणीवरून काही युवकांनी परिसरातील वाहने फोडली.

Protest march in Nandurbar turns violent, mob vandalizes some vehicles | नंदुरबारमध्ये निषेध मोर्चाला हिंसक वळण, जमावाकडून काही वाहनांची तोडफोड

नंदुरबारमध्ये निषेध मोर्चाला हिंसक वळण, जमावाकडून काही वाहनांची तोडफोड

नंदुरबार - येथील युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चाला जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचल्यावर आत जाऊ देन्याच्या मागणीवरून काही युवकांनी परिसरातील वाहने फोडली. जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांना अश्रू धुरचा नळकांड्या फोडव्या लागल्या.

नंदुरबारातील जय वळवी या युवकाच्या खुनातील आरोपीना कडक शिक्षा व्हावी या मागणीसाठी व निषेध म्हणून बुधवारी मोर्चा काढण्यात आला. मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला असता काही जणांनी आत जाऊ देण्याचा आग्रह धरला त्यावरून पोलीस व मोर्चेकरी यांच्यात वाद झाल्याने काही जणांनी परिसरातील वाहने तोडफोड केली. जमावला पांगवण्यासाठी अश्रू धुराच्या नलकांडया फोडाव्या लागल्या. शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

Web Title : नंदुरबार में विरोध प्रदर्शन हिंसक: युवक की हत्या के बाद वाहनों में तोड़फोड़

Web Summary : नंदुरबार में एक युवक की हत्या के बाद विरोध प्रदर्शन हिंसक हो गया। न्याय की मांग करते हुए प्रदर्शनकारियों ने कलेक्टर कार्यालय के पास वाहनों में तोड़फोड़ की। पुलिस ने भीड़ को तितर-बितर करने के लिए आंसू गैस का इस्तेमाल किया, जिसके कारण तनावपूर्ण शांति बनी हुई है।

Web Title : Nandurbar Protest Turns Violent: Vehicles Vandalized After Youth's Murder

Web Summary : Protests in Nandurbar following a youth's murder turned violent. Demanding justice, protestors vandalized vehicles near the Collector's office. Police used tear gas to disperse the crowd, leading to a tense calm.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.