शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
10
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
11
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
12
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
13
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
14
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
15
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
16
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
17
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
18
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
19
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानक परिसरात देह विक्री व्यवसाय पुन्हा सुरू, पोलिसांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:44 IST

नंदुरबार : शहरातील बसस्थानक परिसरात देह विक्री व्यवसाय पुन्हा सुरू झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीची भावना असून पोलिसांनी याकडे ...

नंदुरबार : शहरातील बसस्थानक परिसरात देह विक्री व्यवसाय पुन्हा सुरू झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीची भावना असून पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून येथील व्यवसायाला आळा बसला होता. आता तो कुणाच्या आशीर्वादाने सुरू झाला आहे याबाबत चर्चा सुरू आहे.

शहरातील जुनी दूध डेअरी परिसरात पूर्वी देह विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालत होता. नागरिकांच्या वाढत्या तक्रारी आणि नवीन बसस्थानक या परिसरात आल्याने व्यवसाय बंद करण्याच्या मागणीने जोर धरला होता. त्यामुळे तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक अनिता पाटील यांनी थेट कारवाई करीत हा व्यवसाय बंद केला होता. तीन ते चार वर्ष हा व्यवसाय बंद राहिल्यानंतर आता तो पुन्हा सुरू झाला आहे. त्यामुळे शहरवासीयांमध्ये नाराजीची भावना आहे.

या परिसरात नवीन बसस्थानक आल्याने प्रवाशांची मोठी गर्दी असते. याच ठिकाणी महायोद्धा वीर राणाप्रताप यांचा अश्वारूढ पुतळा आहे. शाळेत, महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी बसस्थानकातून उतरल्यावर याच रस्त्याने जातात व येतात. बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांची देखील मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. आता शॅापिंग कॉम्पलेक्स झाल्याने ग्राहकांचीही येथे वर्दळ असते. शिवाय बाजूलाच एस.टी.कर्मचारी यांचे निवासस्थान देखील आहे. अशा गजबजलेल्या भागात देह विक्रीचा व्यवसाय पुन्हा सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या व्यवसायामुळे या भागात इतरही अवैध व्यवसाय सुरू झाले आहेत.

शहरात आधीच सट्टा, मटका, जुगार जोरावर आहे. कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सुरुवातीला जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर जरब बसविली होती. आता मात्र नंदुरबार शहरात ते खुलेआम सुरू आहेत. त्यातच देह विक्रीचाही व्यवसाय सुरू झाल्याने शहरवासीयांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचाही आरोप होत आहे.