शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

महुपासून सॅनिटायझर बनविण्याच्या प्रकल्पाला चालना हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 21:10 IST

रमाकांत पाटील। लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आदिवासी भागातील कल्पवृक्ष म्हणून परिचित असलेल्या महुपासून सॅनिटायझर बनविण्याचा प्रयोग मध्यप्रदेश सरकारने ...

रमाकांत पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी भागातील कल्पवृक्ष म्हणून परिचित असलेल्या महुपासून सॅनिटायझर बनविण्याचा प्रयोग मध्यप्रदेश सरकारने केला आहे. याच धर्तीवर महाराष्टÑ शासनानेही हा प्रकल्प राबवून सध्याच्या कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत उपाययोजनांसाठीही त्याचा वापर होऊ शकतो व शेकडो हातांना त्यातून रोजगारही उपलब्ध होणार आहे.महूचे वृक्ष अनेक आजारांवर रामबाण मानले जाते. विशेषत: आदिवासी संस्कृतीत माणासाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंतच्या विविध संस्कारात त्याचा वापर वेगवेगळ्या माध्यमातून होतो. सातपुड्यात महूचे हजारो वृक्ष असून, दरवर्षी हंगामात महूचे फुल अनेकांना रोजगार देत असते. या महुचा वापर अजून एका गुणकारी रसायनासाठी होवू शकतो. सध्याच्या कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत संरक्षणासाठी अनेक प्रकारचे सॅनिटायझर बाजारात आले आहेत. त्यांच्या किमती सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्या तरी या परिस्थितीत ती आवश्यक बाब झाल्याने त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला आहे. नव्हे तर बाजारात अधून मधून त्याची टंचाईही जाणवत असल्याचा अनुभव लोकांनी घेतला.या पार्श्वभूमीवर महूपासून सॅनिटायझर बनविण्याचा प्रायोगिक प्रकल्प मध्यप्रदेशातील धामणदा येथील श्रीहरि आजीविका स्वयंसहाय्यता बचत गटाने राबविला आहे. हा प्रयोग त्यांचा यशस्वी झाला असून, महूच्या अर्कापासून ते बनविले जात आहे. महाराष्ट्रातील सिमेला लागून असलेल्या सातपुड्याच्या मध्यप्रदेशातील गावात हा प्रयोग राबविण्यात आला आहे. महाराष्टÑातही राबविणे तो शक्य आहे. सध्या महुचा हंगाम सुरू झाला असून, महूचे वृक्ष बहरले आहे. तसेच याच काळात शासनानेही रोजगार हमी योजनेच्या कामांना गती दिली आहे. स्थानिक मजूर रिकाम्या हाती आहेत. शिवाय स्थलांतरीत मजुरांनाही आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महूपासून सॅनिटायझरचा प्रकल्प झाल्यास त्यातून अनेकांना रोजगारही मिळू शकतो. शिवाय रोजगार हमी योजनेवर जाणाऱ्या मजुरांसाठी कोरोनापासून संरक्षणाकरीता हे सॅनिटायझर वापरण्यासही मदत होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही अशा प्रयोगाला प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे़ त्यासाठी आदिवासी विकास विभागाने पुढाकार घेण्याची गरज आहे़महूपासून सॅनिटायझर बनविता येत असेल तर महाराष्टÑातही असे प्रयोग राबविण्यास हरकत नाही. सातपुडा आणि महाराष्टÑातील इतर भागात महूचे वृक्ष मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे आपण सुद्धा प्रायोगिक तत्वावर नंदुरबार जिल्ह्यात सातपुड्याच्या भागात तो राबविण्याचा विचार करू शकतो. त्यासाठी प्रकल्पाधिकारी व तज्ञांना या संदर्भात अधिक माहिती आणि अभ्यास करण्यासाठी आपण सूचना करणार आहोत.-अ‍ॅड.के.सी. पाडवी, मंत्री आदिवासी विकास विभाग,महाराष्टÑ शासन मुंबई.